Gujarat Assembly Election 2022: गुजरातच्या 'मतसंग्रामा'चा शंखनाद, दोन टप्प्यांत मतदान; निकालाचा दिवसही ठरला!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2022 12:38 IST2022-11-03T12:36:37+5:302022-11-03T12:38:37+5:30
Gujarat Assembly elections 2022: गुजरात विधानसभा निवडणुकीचे बिगुल अखेर वाजले असून राज्यातील १८२ मतदार संघांसाठी निवडणुकीची घोषणा करण्यात आली आहे.

Gujarat Assembly Election 2022: गुजरातच्या 'मतसंग्रामा'चा शंखनाद, दोन टप्प्यांत मतदान; निकालाचा दिवसही ठरला!
Gujarat Assembly elections 2022: गुजरात विधानसभा निवडणुकीचे बिगुल अखेर वाजले असून राज्यातील १८२ मतदार संघांसाठी निवडणुकीची घोषणा करण्यात आली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगानं आज पत्रकार परिषद घेऊन निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. गुजरातमध्ये एकूण दोन टप्प्यात मतदान होणार असून पहिल्या टप्प्यातील मतदान १ डिसेंबर मतदान होणार आहे. तर दुसऱ्या टप्प्यातील मतदान ५ डिसेंबर रोजी होईल. मतमोजणी ८ डिसेंबर रोजी होणार आहे. याच दिवशी हिमाचल प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीचीही मतमोजणी जाहीर होणार आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी आज पत्रकार परिषद घेऊन गुजरात विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. गुजरातमध्ये यंदा ३ लाख २४ हजार नवे मतदार आहेत. तसंच राज्यात एकूण ५१,७८२ मतदान केंद्र सज्ज असणार आहेत. यासाठी कडेकोड सुरक्षा व्यवस्था देखील असणार आहे. सर्व मतदान केंद्रांवर सर्व सुविधा असतील. पिण्याचं पाणी, वेटिंग रुम, टॉयलेट, दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी खास सुविधा यांचा समावेश असणार आहे. तसंच राज्यातील ५० टक्के मतदान केंद्रांवर मतदानाचं लाइव्ह टेलिकास्ट देखील होणार आहे.
Schedule for GE to the Legislative Assembly of Gujarat.
— Election Commission of India #SVEEP (@ECISVEEP) November 3, 2022
#GujaratElections2022#ECIpic.twitter.com/0A6CSUIJV5
निवडणूक आयोगाकडून यावेळी सोशल मीडिया टीम देखील नियुक्त करण्यात येणार आहेत. ज्या फेक न्यूजवर लक्ष ठेवणार आहेत. फेक न्यूजचा प्रसार करणाऱ्यांवर तातडीनं जी काही कठोर कारवाई असेल ती केली जाणार असल्याचं राजीव कुमार यांनी सांगितलं. तसंच फेक न्यूज फॉरवर्ड करू नका आवाहन देखील यावेळी राजीव कुमार यांनी मतदारांना केलं आहे.
असा आहे गुजरातचा संपूर्ण निवडणूक कार्यक्रम-
पहिला टप्पा-
निवडणुकीसाठीचे नोटिफिकेशन- ५ नोव्हेंबर २०२२
अर्ज दाखल करण्याची मुदत- १४ नोव्हेंबर २०२२
अर्ज छाननी प्रक्रिया- १५ नोव्हेंबर २०२२
उमेदवारी माघार घेण्याची मुदत- १७ नोव्हेंबर २०२२
मतदानाची तारीख- १ डिसेंबर २०२२
दुसरा टप्पा
निवडणुकीसाठीचे नोटिफिकेशन- १० नोव्हेंबर २०२२
अर्ज दाखल करण्याची मुदत- १७ नोव्हेंबर २०२२
अर्ज छाननी प्रक्रिया- १८ नोव्हेंबर २०२२
उमेदवारी माघार घेण्याची मुदत- २१ नोव्हेंबर २०२२
मतदानाची तारीख- ५ डिसेंबर २०२२
मतमोजणी- ८ डिसेंबर २०२२