शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

Gujarat Election 2022: गुजरात निवडणुकीत भाजपनं झोकली संपूर्ण शक्ती, किल्ला वाचविण्यासाठी 18 वर्षांनंतर करणार 'कारपेट बॉम्बिंग'

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2022 20:05 IST

राजकारणात 2004 च्या लोकसभा निवडणुकीत कारपेरेट बॉम्बिंगचा पहिला वापर भाजपनेच केला होता. तेव्हा भाजपचे दिग्गज नेते प्रमोद महाजन यांनी हा शब्द वापरला होता.

गुजरात विधानसभा निवडणुकीची तारीख जसजशी जवळ येऊ लागली आहे, तसतसा राजकीय पक्षांचा प्रचारही वेग घेऊ लागला आहे. सत्ताधारी भारतीय जनता पक्षाने (भाजप) राज्यात पुन्हा सरकार स्थापन करण्यासाठी आपली संपूर्ण शक्ती झोकून दिली आहे. राज्यात शुक्रवारी भाजपचे कारपेट बॉम्बिंग होणार आहे. महत्वाचे म्हणजे, राजकारणात 2004 च्या लोकसभा निवडणुकीत कारपेरेट बॉम्बिंगचा पहिला वापर भाजपनेच केला होता. तेव्हा भाजपचे दिग्गज नेते प्रमोद महाजन यांनी हा शब्द वापरला होता.

भाजपचे दिग्गज नेते करणार प्रचार - गुजरातमध्ये पहिल्या टप्प्यात विधानसभेच्या 89 पैकी 82 विधानसभा मतदारसंघात पक्षाच्या केंद्रीय नेत्यांपासून ते राज्यातील नेत्यांपर्यंत दिवसभर जबरदस्त प्रचार होईल. पक्षाध्यक्ष जे पी नड्डा, योगी आदित्यनाथ यांच्यासह अनेक केंद्रीय मंत्री उद्या गुजरात मध्ये असणार आहेत. भाजप उद्या हाच शब्द पुन्हा एकदा आमलात आणणार आहे. एकाच दिवसात पहिल्या टप्प्यातील जवळपास सर्वच जागांवर अनेक मोठे नेते प्रचार करणार आहेत.

या टप्प्यातील 89 जागांपैकी 82 जागांवर भाजप अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा, राष्ट्रीय संघटन, केंद्रीय मंत्रिमंडळ, भाजप शासित राज्यांतील मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री, देशतील विवीध लोकसभा मतदार संघांतील एकूण 46 खासदार आणि राज्य सरकारमधील मुख्यमंत्री, मंत्री, पूर्व मुख्यमंत्री, पूर्व उप मुख्यमंत्री, पूर्व कॅबिनेट मंत्री, राज्यातील खासदार आणि संघटनेतील पदाधिकारी भाजप उमेदवारांच्या समर्थनार्थ सभा घेतील. 

या नेत्यांमध्ये जेपी नड्डा, नितिन गडकरी, नरेंद्र तोमर, अनुराग ठाकुर, जनरल व्हीके सिंह, मनसुख मांडविया, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान , उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ,पश्चिम बंगालमधील विरोधी पक्ष नेते शुभेंदू अधिकारी, भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय युवा मोर्चाचे अध्यक्ष तेजस्वी सूर्या आणि लडाखमधील खासदार जमयांग सेरिंग नामग्याल हे विविध भागांत रॅली करतील.

यांच्याशिवाय, मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल, माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी, नितिन पटेल, पुरुषोत्तम रूपाला, पूनमबेन माडम, माजी कॅबिनेट मंत्री गुजरात सरकार वजूभाई वाला, आरसी फळदू , गणपत वसावा, पुरुषोत्तम सोलंकी यांच्यासह अनेक नेते भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांच्या समर्थनार्थ प्रचार करतील आणि सभांना संबोधित करतील. याशिवाय, 19 नोव्हेंबरपासून 21 नोव्हेंबरदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरातमध्ये 8 सभांना संबोधित करतील. तसेच रोड शोही करतील. 

गुजरातमध्ये 1 आणि 5 डिसेंबरला मतदान होईल आणि 8 डिसेंबरला दोन टप्प्यांत सर्वच्या सर्व 182 जागांवर मतदान होईल. पहिल्या टप्प्यात 89 जागांसाठी, तर दुसऱ्या टप्प्यात 93 जागांसाठी मतदान होईल. 

टॅग्स :Gujarat Assembly Election 2022गुजरात विधानसभा निवडणूक 2022GujaratगुजरातNarendra Modiनरेंद्र मोदीAmit Shahअमित शाहJ P Naddaजगत प्रकाश नड्डाyogi adityanathयोगी आदित्यनाथBJPभाजपा