शहरं
Join us  
Trending Stories
1
"आशिष शेलारांनी एकाच दगडात अनेक पक्षी मारले.."; उद्धव ठाकरेंनी केले कौतुक, नेमकं काय म्हणाले?
2
'आमच्याकडे सर्वाधिक अणुबॉम्ब, पृथ्वी 150 वेळा नष्ट होईल', डोनाल्ड ट्रम्पचा यांचा धक्कादायक दावा
3
Gen Z युवकांना सरकार का घाबरतंय?; उद्धव ठाकरेंचा सवाल, शाखेत उभी राहणार 'मतदार ओळख केंद्र'
4
Gold Silver Price 3 Nov: सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा बदल; पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेट Gold चे लेटेस्ट रेट
5
पाकिस्तानने अण्वस्त्रचाचणी केली, डोनाल्ड ट्रम्प यांचा सनसनाटी दावा, दक्षिण आशियात तणाव वाढणार?
6
पडद्यामागचे तीन ‘शिल्पकार’! 'या' त्रिसूत्री धोरणासह भारतीय महिला संघानं लिहिली अविस्मरणीय स्क्रिप्ट
7
"मी तर चांगलं काम केलं होतं...", राष्ट्रीय पुरस्कार उशिरा मिळाल्याने शाहरुख खानने व्यक्त केली खंत
8
Tulasi Vivah 2025: तुलसी विवाहासाठी रामा तुळस योग्य की श्यामा? जाणून घ्या मुख्य भेद 
9
चीनला शह देण्याचा प्रयत्न! भारत ₹७००० कोटींपेक्षा अधिक रकमेची बनवतोय योजना
10
राज ठाकरे सकाळी ९च्या गर्दीत बदलापूर-कल्याणला चढून लोकल ट्रेनमध्ये विंडो सीट पकडू शकतील का?
11
Deepti Sharma : "मुलीला क्रिकेट खेळू देऊ नका..."; दीप्ती शर्माचे आई-वडील भावुक, सांगितला संघर्षमय प्रवास
12
टाटा ट्रस्ट्समध्ये नवा पेच! पुनर्नियुक्ती नाकारल्यानंतर मेहेली मिस्त्री यांचं मोठं पाऊल; सर्वांनाच पाठवली नोटीस
13
एकनाथ खडसेंच्या बंगल्यातून CD, पेनड्राईव्ह, कागदपत्रे चोरी झालेच नाहीत?, पोलीस तपासात काय समोर आलं?
14
राज ठाकरेंना दोन लाख मुस्लीम दुबार मतदार का दिसले नाहीत? शेलार म्हणाले, 'अजून वेळ गेलेली नाही'
15
'सीपीआर द्यायचं माहीत नाही, व्हिडीओ काढले'; महिला वकिलाचा कोर्टातच दुर्दैवी मृत्यू, शेजारीच होते रुग्णालय
16
हनिमूनसाठी जोडप्याने बुक केली दुबई ट्रीप, लाखो रुपये दिले; परदेशात पोहोचल्यावर बसला मोठा धक्का!
17
पाकिस्तानबद्दल एक गोष्ट सांगून डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताचं टेंशन वाढवलं? असं काय म्हणाले अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष?
18
यूपी, बंगाल, तामिळनाडूसह 12 राज्यांमध्ये उद्यापासून SIR प्रक्रिया सुरू; 'या' पक्षांचा तीव्र विरोध...
19
'भुल भूलैया ४'मध्ये अक्षय कुमार-कार्तिक आर्यन एकत्र येणार? चर्चा सुरु; दिग्दर्शक म्हणाले...

आपच्या कार्यालयात सापडला मद्यपी कार्यकर्ता; फोटो पाहून भाजप नेते पेटले अन् नंतर माफी मागत सुटले

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2021 11:52 IST

आपच्या कार्यालयात सापडला मद्यपी; पण माफी मागत सुटले भाजप नेते; नेमकं घडलं तरी काय? 

सूरत: पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचं होमग्राऊंड असलेल्या गुजरातमध्ये गेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस आणि भाजपमध्ये थेट टक्कर पाहायला मिळाली. मात्र पुढील विधानसभा निवडणुकीत भाजप, काँग्रेस, आम आदमी पार्टी अशी तिहेरी निवडणूक रंगण्याची शक्यता आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये जोरदार मुसंडी मारत आपनं लक्षवेधी कामगिरी केली. तेव्हापासून आपचे संयोजक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी गुजरातकडे लक्ष केंद्रीत केलं आहे.

आपनं पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. आप आणि भाजपमध्ये जोरदार संघर्ष पाहायला मिळत आहे. सूरतमधील आपच्या कार्यालयातील एका कार्यकर्त्याचा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. सूरतमध्ये नुकत्याच उद्घाटन झालेल्या कार्यालयात एक कार्यकर्ता मद्यधुंद स्थितीत दिसत आहे. भाजपच्या स्थानिक नेत्यांनी हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल करत भाजपची खिल्ली उडवली. प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचल्यानंतर फासे उलटे पडले आणि भाजपच्या नेत्यांनी माफी मागावी लागली.

सूरतमधील गोपीपुरा भागातील आपच्या कार्यालयातील मद्यधुंद व्यक्तीचा फोटो भाजपच्या नेत्यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून शेअर केला. आपचा कार्यकर्ता मद्यधुंद होऊन पक्ष कार्यालयात आडवा झाल्याचं अप्रत्यक्ष संदेश या माध्यमातून भाजपच्या नेत्यांनी लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. यानंतर आपच्या नेत्यांनी या कार्यकर्त्याचा फोटो पाहून पडताळणी सुरू केली. त्यात हा कार्यकर्ता भाजपचाच असल्याची माहिती समोर आली.

सीसीटीव्ही फुटेजमधून सत्य समोरसूरतच्या गोपीपुरा भागात आपचं कार्यालय आहे. त्याच्या अगदी समोरच भाजपचं कार्यालय आहे. भाजपचा कार्यकर्ता हिमांशु मेहता दारूच्या नशेत आपच्या कार्यालयात जाऊन झोपल्याचं सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहे. या प्रकरणी पोलीस तक्रार दाखल झाल्यानंतर आणि सत्य समोर आल्यानंतर भाजप नेते बॅकफूटवर आले. आधी तो कार्यकर्ता आमचा नाहीच, असा पवित्रा भाजपनं घेतला. त्यानंतर मात्र भाजप नेते प्रशांत बारोट यांनी माफिनामा लिहिला. यानंतर भाजपच्या इतर नेत्यांनीदेखील माफी मागितली.

टॅग्स :AAPआपBJPभाजपाcongressकाँग्रेसArvind Kejriwalअरविंद केजरीवालNarendra Modiनरेंद्र मोदीAmit Shahअमित शहा