्रगुलाबराव देवकरांनी घेतली बैठक जि.प., पं.स.ची तयारी : इच्छुक उमेदवारांची घेतली माहिती

By Admin | Updated: October 6, 2016 22:23 IST2016-10-06T22:23:22+5:302016-10-06T22:23:22+5:30

जळगाव : माजी राज्यमंत्री गुलाबराव देवकर यांनी गुरुवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या आकाशवाणी चौकानजीकच्या कार्यालयात जळगाव ग्रामीण मतदारसंघातील पदाधिकार्‍यांसोबत बैठक घेतली. त्यात त्यांनी जि.प. व पं.स.निवडणूक लढण्यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांची माहिती गोळा केली.

Gugaabrao Deokar meeting held in ZP, Pt. Preparation of interested candidates | ्रगुलाबराव देवकरांनी घेतली बैठक जि.प., पं.स.ची तयारी : इच्छुक उमेदवारांची घेतली माहिती

्रगुलाबराव देवकरांनी घेतली बैठक जि.प., पं.स.ची तयारी : इच्छुक उमेदवारांची घेतली माहिती

गाव : माजी राज्यमंत्री गुलाबराव देवकर यांनी गुरुवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या आकाशवाणी चौकानजीकच्या कार्यालयात जळगाव ग्रामीण मतदारसंघातील पदाधिकार्‍यांसोबत बैठक घेतली. त्यात त्यांनी जि.प. व पं.स.निवडणूक लढण्यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांची माहिती गोळा केली.
तसेच जे इच्छुक असतील त्यांनी पक्षाकडे किंवा तालुका कार्यकारिणीकडे नावे द्यावी, असे आवाहन त्यांनी केले. या वेळी विधानसभा क्षेत्रप्रमुख गोपाळ फकिरचंद पाटील, पं.स.सदस्य लता बारी, नथाबाई गवळे, विलास बळीराम पाटील, तालुकाध्यक्ष बापू परदेशी, विजय नारखेडे, प्रदीप भोळे, पंकज महाजन आदी उपस्थित होते.
यानंतर तालुका, महिला व युवक कार्यकारिणीमधील सदस्यांचा परिचय करून घेण्यात आला. आपण चार वर्षे कार्यकर्त्यांसोबत बैठक घेतली नाही. परंतु यापुढे भेट राहू, असे देवकर यांनी सांगितले.
तालुका दौरा करणार
येत्या महिन्यापासून मतदारसंघात दौरा करील. त्यात पदाधिकारी, कार्यकर्ते, मतदार ज्या व्यक्तीच्या नावाला पसंती देतील त्याची उमेदवारी निश्चित केली जाईल, असे देवकर यांनी सांगितले.

Web Title: Gugaabrao Deokar meeting held in ZP, Pt. Preparation of interested candidates