शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

हॉटेलमधील जेवण स्वस्त होण्याची शक्यता, जीएसटी 18 टक्क्यावरून होणार 12 टक्के ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2017 09:59 IST

लहान उद्योजक आणि निर्यातदारांना दिलासा दिल्यानंतर सरकार आता शहरातील मध्यम वर्गीयांना दिलासा देण्यासाठी जीएसटीमध्ये मोठी सूट देण्याची शक्यता आहे.

ठळक मुद्देलहान उद्योजक आणि निर्यातदारांना दिलासा दिल्यानंतर सरकार आता शहरातील मध्यम वर्गीयांना दिलासा देण्यासाठी जीएसटीमध्ये मोठी सूट देण्याची शक्यता आहे. जीएसटी काऊंसिलच्या पुढील बैठकीत एसी हॉटेलमधील जेवणावर असलेला जीएसटी कमी होण्याच शक्यता आहे. सध्या एसी हॉटेलमधील जेवणावर 18 टक्के जीएसटी आकारला जातो ही टक्केवारी कमी करून 12 टक्के होण्याची शक्यता आहे.

नवी दिल्ली- लहान उद्योजक आणि निर्यातदारांना दिलासा दिल्यानंतर सरकार आता शहरातील मध्यम वर्गीयांना दिलासा देण्यासाठी जीएसटीमध्ये मोठी सूट देण्याची शक्यता आहे. जीएसटी काऊंसिलच्या पुढील बैठकीत एसी हॉटेलमधील जेवणावर असलेला जीएसटी कमी होण्याच शक्यता आहे. सध्या एसी हॉटेलमधील जेवणावर 18 टक्के जीएसटी आकारला जातो ही टक्केवारी कमी करून 12 टक्के होण्याची शक्यता आहे. जीएसटी काऊंसिलच्या बैठकीत हा निर्णय झाला तर हॉटेलमधील जेवण आधीच्या तुलनेत कमी होणार आहे. पण जर या प्रस्तावाला मंजुरी मिळाली तर हॉटेल मालकांना इनपुट टॅक्स क्रेडिटचा फायदा सोडावा लागणार आहे.

सध्या एसी हॉटेलमध्ये 18 टक्के आणि  नॉन-एसी हॉटेलमध्ये 12  टक्के जीएसटी आकारला जातो. जर या दोन्ही प्रकारच्या हॉटेलमध्ये जीएसटी एकसमान केला गेला तर हॉटेल मालकांना इनपूटवर भरलेल्या टॅक्सवर क्लेम करण्याची सुविधा सोडावी लागू शकते. 'हॉटेल मालक ग्राहकांना इनपूट टॅक्स क्रेडिटचा फायदा देत नसल्याचं निदर्शनास आलं आहे. यामुद्द्यावर विचार करण्यासाठी जीएसटी काऊंसिलने एक कमिटी तयार केली असल्याचं', एका अधिकाऱ्याने सांगितलं आहे. 

हॉटेल मालकांनी सगळ्या प्रकारच्या हॉटेल्ससाठी 12 टक्के जीएसटी निश्चित करण्याबरोबरच इनपूट टॅक्स क्रेडिटचा फायदा कायम ठेवण्याची मागणी केली होती. एक करोड रूपये वार्षीक उत्पन्न असणारे हॉटेल माल कंपोजिशन स्कीमचा वापर करू शकतात. ज्यामध्ये इनपूट टॅक्स क्रेडिटबरोबर 5 टक्के टॅक्स भरावा लागतो. लहान उद्योजकांसाठी सरकारने ही योजना सुरू केली होती.  

हॉटेलमध्ये ग्राहकांकडून 18 टक्के जीएसटी घेऊनसुद्धा त्यांना टॅक्स क्रेडिटचा फायदा ग्राहकांना देत नव्हते, अशा प्रकारच्या तक्राली जीएसटी काऊंसिलकडे आल्या होत्या. 1 जुलैपासून जीएसटी लागू झाल्यानंतर अशा प्रकारच्या सर्व्हिसेसवर टॅक्स 15 टक्क्यांवरून 18 टक्के करण्यात आला होता. उद्योजकांकडून लॉबिंग केल्यानंतर जीएसटी काऊंसिलने कंपोजिशन स्कीमला जास्त आकर्षक करण्यासाठी आणि हॉटेलवरील जीएसटीसंदर्भात पुन्हा विचार करण्यासाठी आसामचे अर्थ मंत्री हेमंत विश्व शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली एक कमिटी तयार केली होती तसंच कमिटीला दोन आठवड्यात अहवाल देण्यास सांगितलं होतं. अधिकाऱ्याच्या माहितीनुसार, कमिटीने  त्यांच्या सूचनांना अंतिम रूप दिलं आहे. आसामचे अर्थ मंत्री हेमंत विश्व शर्मा यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिसमूहाने शुक्रवारी नवी दिल्लीमध्ये झालेल्या पहिल्या बैठकीत या महत्त्वाच्या मुद्द्यावर एकमत दर्शविलं. 

टॅग्स :GSTजीएसटीhotelहॉटेलGovernmentसरकार