शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
2
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
3
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
4
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
5
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 
6
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
7
पाच टप्पे, ‘चौसष्टी’च्या फेऱ्यात; राजकारण ढवळले, प्रचारसभांतील आरोप-प्रत्यारोपांना मिळाला पूर्णविराम
8
मविआ राज्यात ४६ जागा जिंकणार; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला विश्वास
9
केजरीवाल यांचे माजी पीए बिभव कुमार अखेर अटकेत; स्वाती सहज बाहेर पडल्या, ‘आप’ने जारी केला व्हिडीओ 
10
प्रचारतोफा शांत; राज्यात उद्या अखेरच्या टप्प्यातील मतदान; देशातील ८ राज्यांतील ४९ मतदारसंघांत लढत
11
आता भाजप सक्षम, सगळे निर्णय स्वबळावर; रा.स्व. संघाची मदत घेण्याबाबत जे.पी.नड्डा यांचे मत
12
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
13
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
14
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
15
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
16
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
17
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
18
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
19
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
20
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी

राज्यांना GSTची पूर्ण नुकसानभरपाई देणार, केंद्र सरकारचा मोठा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Published: September 08, 2020 4:03 PM

वित्त मंत्रालयातील अधिका-यांच्या म्हणण्यानुसार केंद्र सरकार राज्यांच्या जीएसटी भरपाईची संपूर्ण 2.35 लाख कोटी रुपयांची भरपाई करेल.

संपूर्ण जीएसटी भरपाई केंद्र सरकार राज्य सरकारांना देणार आहे, अशी माहिती वित्त मंत्रालया(Finance Ministry)च्या सूत्रांच्या हवाल्यानं मिळाली आहे. जीएसटी भरपाईबाबतच्या अफवांवर स्पष्टीकरण देण्यात आले आहे. जीएसटी भरपाईचे नुकसान कोरोना व्हायरसमुळे किंवा जीएसटीच्या अंमलबजावणीमुळे होऊ शकते. पण नुकसानभरपाई देण्यात केंद्राने कधीही हात आखडता घेतला नाही. जीएसटी कौन्सिलच्या बैठकीत केंद्राने राज्यांना दोन पर्याय दिले आहेत.वित्त मंत्रालयातील अधिका-यांच्या म्हणण्यानुसार केंद्र सरकार राज्यांच्या जीएसटी भरपाईची संपूर्ण 2.35 लाख कोटी रुपयांची भरपाई करेल. जीएसटीच्या संकलनात घट झाली आहे, असेही अधिका-यांनी सांगितले, परंतु असे असूनही राज्यांना संपूर्ण भरपाईची रक्कम दिली जाईल. केंद्र राज्यांना भरपाईची रक्कम देणार नसल्याच्या बातम्या प्रसारित झाल्या होत्या, त्या सर्व चुकीच्या आणि निराधार असल्याचंही  मोदी सरकारनं स्पष्ट केलं आहे.केंद्राच्या हिशेबानुसार, जीएसटी लागू झाल्यामुळे या रकमेपैकी केवळ 97,000 हजार कोटींचा तोटा होईल तर कोरोनाच्या परिणामामुळे उर्वरित 1.38 लाख कोटी रुपयांच्या महसुलाचे नुकसान होईल. मागील महिन्यात केंद्र सरकारने जीएसटीच्या महसुलाची भरपाई करण्यासाठी दोन पर्याय राज्यांसमोर ठेवले होते. एक पर्याय देण्यात आला होता की, राज्यांनी रिझर्व्ह बँकेद्वारे प्रदान केलेल्या विशेष विंडो सुविधेकडून कर्ज घेऊन 97,000 कोटी रुपयांचा जीएसटी भरपाई पूर्ण करावा आणि दुसरा पर्याय म्हणजे राज्ये बाजारातून संपूर्ण 2.35 लाख कोटी रुपये जमा करतात.या कर्जाची परतफेड करण्यासाठी जीएसटी भरपाई उपकर 2022 नंतरही सुरू ठेवला जाईल. जीएसटी भरपाई उपकर लक्झरी, अनावश्यक आणि नाश न झालेल्या वस्तूंवर लावला जातो. सहा बिगरभाजपा शासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी केंद्र सरकारला पत्र लिहून राज्यांना दिलेल्या दोन्ही पर्यायांचा विरोध केला आहे. पश्चिम बंगाल, केरळ, दिल्ली, तेलंगणा, छत्तीसगड आणि तामिळनाडू या राज्यांनी महसुलासाठी कर्ज घेण्याच्या सूचनेकडे दुर्लक्ष करून नुकसानभरपाईची व्यवस्था करण्यास केंद्राला सांगितले आहे. केंद्र सरकारच्या सूत्रांनी सांगितले की, जीएसटी कायद्यांतर्गत भरपाई उपकर हा एक कर आहे, जो राज्यांकडून वसूल केला जातो. केंद्राचा यावर अधिकार नाही, अशा परिस्थितीत या करांच्या ऐवजी केंद्र सरकार बाजारातून कर्ज घेऊ शकत नाही.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीGSTजीएसटी