शहरं
Join us  
Trending Stories
1
जयंत पाटलांची प्रदेशाध्यपद सोडण्याची इच्छा, म्हणाले, "शरद पवार यांना विनंती करतो, त्यांनी..."
2
सोनम रघुवंशीनं किती रुपयांत केली होती पती राजाच्या जीवाची 'डील'? कुणाला किती रुपये दिले अ‍ॅडव्हॉन्स? जाणून थक्क व्हाल!
3
अजित पवारांसोबत जाण्याबाबत सुप्रिया सुळेंचे मोठे विधान; पक्षाच्या वर्धापनदिनी म्हणाल्या...
4
२४ तास उलटूनही आग शमेना, अजूनही येतायत स्फोटांचे आवाज! केरळच्या समुद्रात सुरू आहे मोठं रेस्क्यू ऑपरेशन
5
Raj Kushwaha : "माझा मुलगा २० वर्षांचा, पोलीस खोटं बोलताहेत"; सोनमचा बॉयफ्रेंड राज कुशवाहच्या आईचा दावा
6
आर्थिक अडचणींना वैतागून एमबीबीएस विद्यार्थ्याची आत्महत्या; जेजे रुग्णालयाच्या वसतिगृहातील घटना!
7
'मी विधवा होऊन...', सोनम रघुवंशीनं दिलं होतं आश्वासन; ओरडून म्हणाली, 'मार दो इसे...!' 'खतरनाक' होतं संपूर्ण प्लॅनिंग
8
Vat Purnima Vrat 2025: वट पौर्णिमेची पूजा झाली, पण घाईघाईत कथा वाचायची राहून गेली? वाचा 'ही' कथा!
9
फक्त या कारणामुळे आशुतोष राणाने रेणुका शहाणेसोबत केलं लग्न, २४ वर्षांनंतर अभिनेत्रीचा खुलासा
10
"मला लग्नच करायचं नव्हतं...", उषा नाडकर्णींनी पहिल्यांदाच लग्नावर केलेलं भाष्य
11
भरमैदानात महिला अंपायरवर भडकला, आर अश्विनला चुकवावी लागली किंमत, ठोठवला मोठा दंड
12
चांदीने मोडले सर्व रेकॉर्ड! 'रिच डॅड पुअर डॅड' पुस्तकाच्या लेखकाचं भाकीत खरं ठरतंय! अजूनही आहे संधी?
13
Sonam Raghuvanshi : "राजा जवळ येतो, जे मला अजिबात आवडत नाही"; सोनमच्या चॅटमधून खळबळजनक खुलासा
14
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईनवर वाहतूक विस्कळीत; प्रवाशांचे प्रचंड हाल, रेल्वेने दिलं स्पष्टीकरण
15
Video: हातात बेड्या, जमिनीवर फेकले अन्...अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्यासोबत अमानुष वागणूक
16
Uber Bike: उबेर बाईक चालकाचे महिला प्रवाशाशी गैरवर्तन; गोरेगाव येथील संतापजनक प्रकार!
17
Lenskart आणणार ८५०० कोटी रूपयांचा IPO; कधी करू शकता गुंतवणूक, काय आहेत डिटेल्स?
18
५०० कर्मचाऱ्यांना फर्स्ट क्लास विमान तिकिट, खर्चासाठी ८.५ लाख अन्.. नक्की कोण आहे ही 'दिलदार' महिला?
19
७ वर्षांनी मोठ्या कोंकणा सेनसोबत डेटिंगच्या चर्चांवर अभिनेत्याने सोडलं मौन, म्हणाला- "विकी-कतरिना..."
20
सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये १४,५८२ पदांवर मेगाभरती...

मुर्मू यांना बिगर एनडीए पक्षांचा वाढता पाठिंबा; कोविंद यांच्यापेक्षा अधिक मते मिळणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2022 11:09 IST

एनडीएचा  घटक पक्ष नसलेल्या बीजेडीने मुर्मू यांना पाठिंबा दिला आहे. वायएसआर-काँग्रेसने देखील अशीच भूमिका घेतली आहे. बसपनेही मुर्मू यांना समर्थन दिले आहे.

हरीश गुप्ता -नवी दिल्ली : राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत आदिवासी समाजाच्या नेत्या द्रौपदी मुर्मू यांना एनडीए तर्फे उमेदवारी देण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतला. मोदी यांच्या या मास्टर स्ट्रोकमुळे  विरोधी पक्षांचे उमेदवार यशवंत सिन्हा यांच्यासमोरील अडचणींमध्ये वाढ झाली आहे. संसदेमध्ये ३७ राजकीय पक्षांचे लोकप्रतिनिधी आहेत. त्यातील १६ पक्ष एनडीएच्या बाजूने आहेत. मात्र बिगर एनडीए पक्षांकडून मुर्मू यांना मिळणाऱ्या पाठिंब्याचे प्रमाण दिवसागणिक वाढते आहे. एनडीएचा  घटक पक्ष नसलेल्या बीजेडीने मुर्मू यांना पाठिंबा दिला आहे. वायएसआर-काँग्रेसने देखील अशीच भूमिका घेतली आहे. बसपनेही मुर्मू यांना समर्थन दिले आहे. त्याशिवाय शिरोमणी अकाली दल, चंद्राबाबू नायडू यांचा तेलुगू देसम पक्ष, राष्ट्रीय लोकतांत्रिक पक्ष (आरएलपी), आसाम युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंट (एयूडीएफ) हे पक्ष देखील मुर्मू यांना पाठिंबा देउ शकतात. जनता दल (एस)चे द्रौपदी मुर्मू यांच्याबद्दल चांगले मत आहे. लोकसभा व राज्यसभेतील प्रत्येकी तीन अपक्ष खासदार द्रौपदी मुर्मू यांच्या बाजूचे आहेत. राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत विरोधी पक्षांच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याचे आप, झारखंड मुक्ती मोर्चा (झामुमो) आदी पक्षांनी आश्वासन दिले होते. मात्र नेमके कोणाला मत द्यायचे याविषयी आता हे पक्ष पुन्हा खलबते करण्याची शक्यता आहे.यशवंत सिन्हा यांच्या उमेदवारी अर्जावर झामुमोचे प्रमुख हेमंत सोरेन हे अनुमोदक व्हावे काँग्रेसकडून प्रयत्न हाेते. मात्र सिन्हा यांनी उमेदवारी अर्ज भरला त्यावेळी सोरेन उपस्थित नव्हते.

कोविंद यांच्यापेक्षा अधिक मते मिळणार?२०१७ साली झालेल्या राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत एनडीएचे उमेदवार रामनाथ कोविंद यांना ६६.३६ टक्के मते मिळून ते विजयी झाले होते. यंदाच्या निवडणुकीत मुर्मू यांना मिळणारा वाढता पाठिंबा लक्षात घेता त्यांना कोविंद यांच्यापेक्षा अधिक मते मिळण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

टॅग्स :BJPभाजपाPresidentराष्ट्राध्यक्षElectionनिवडणूक