लग्नाच्या रिसेप्शनमध्ये मिळालेल्या गिफ्टचा झाला स्फोट, नवरदेवाचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2018 13:14 IST2018-02-24T13:01:10+5:302018-02-24T13:14:10+5:30

रिसेप्शन पार्टीतील धमाल अचानक दुःखात बदलली.

Groom killed after a wedding gift received exploded | लग्नाच्या रिसेप्शनमध्ये मिळालेल्या गिफ्टचा झाला स्फोट, नवरदेवाचा मृत्यू

लग्नाच्या रिसेप्शनमध्ये मिळालेल्या गिफ्टचा झाला स्फोट, नवरदेवाचा मृत्यू

ओडिशा- ओडिशाच्या बोलनगरी जिल्ह्यात एका दांम्पत्याच्या लग्नाचं रिसेप्शन सुरू होतं. पण रिसेप्शन पार्टीतील धमाल अचानक दुःखात बदलली. रिसेप्शनमध्ये नवदांम्पत्याला मिळालेल्या गिफ्टचा स्फोट झाला. या स्फोटात नवरदेवाचा मृत्यू झाला असून नवरी गंभीर जखमी झाली आहे. तसंच नवरदेवाच्या आजीचाही व आणखी एका व्यक्तीचा या स्फोटात मृत्यू झाला आहे. 



 

18 फेब्रुवारी (सोमवारी) रोजी सौम्य शेखर आणि रीमा साहू यांचं लग्न झालं. लग्नानंतर त्यांनी शुक्रवारी (23 फेब्रुवारी) रिसेप्शन पार्टी ठेवली होती. पोलिसांच्या माहितीनुसार, रिसेप्शनला आलेल्या एका अज्ञात व्यक्तीने नवविवाहीत जोडप्याला गिफ्ट दिलं त्याच गिफ्टचा स्फोट झाला.  रिसेप्शन समारंभानंतर घरी सगळे जण मिळालेले गिफ्ट उघडून पाहत होते त्याच दरम्यान त्यातील एका गिफ्टचा स्फोट झाला. या स्फोटात नवरदेवाच्या आजीचा जागीच मृत्यू झाला तर नवरदेव सौम्य शेखऱचा राऊरकेलामधील हॉस्पिटलमध्ये उपचारा दरम्यान मृत्यू झाला. नववधुवर बुरलामधील हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. 

दरम्यान, पोलिसांकडून या घटनेचा तपास सुरू आहे. हे गिफ्ट नेमकं दिलं होणी? याबद्दलची माहिती घेतली जाते आहे. कच्च्या बॉम्बमुळे हा स्फोट झाल्याची माहिती पोलिसांनी माध्यमांना दिली आहे.
 

Web Title: Groom killed after a wedding gift received exploded

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.