शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

नवरीला एकटा बाईकवर घ्यायला आला नवरदेव; पोलीस म्हणाले, "किमान पाच जण तरी आणायचीस"

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2021 21:56 IST

Police Surprised : दुचाकीवर वराला एकटे पाहून कर्तव्यावर तैनात असलेले पोलिसही अस्वस्थ झाले.

ठळक मुद्देसर्व काही निश्चित होते. परंतु लॉकडाऊनमुळे लग्नाच्या वरात काढणं शक्य नव्हते. अशा परिस्थितीत वराने ड्रेस घातला आणि हेल्मेट घालून वधूला दुचाकीवरून आणायला गेला.

बलरामपूर - कोविड -१९ संसर्गामुळे संपूर्ण छत्तीसगडमध्ये लॉकडाउन सुरू आहे. अशा परिस्थितीत विवाहसोहळ्यांमध्ये जाणाऱ्यांची संख्या मर्यादित ठेवण्यात आली आहे. लॉकडाऊनमध्ये बलरामपूर जिल्ह्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये वर आपल्या दुचाकीवरून एकट्याने आपल्या वधूला घ्यायला आला आहे. वर हा झारखंडचा रहिवासी आहे. दुचाकीवर वराला एकटे पाहून कर्तव्यावर तैनात असलेले पोलिसही अस्वस्थ झाले.किंबहुना बलरामपूर रामानुजगंज जिल्ह्यातील सणावल येथे वराचे लग्न होणार होते. सर्व काही निश्चित होते. परंतु लॉकडाऊनमुळे लग्नाच्या वरात काढणं शक्य नव्हते. अशा परिस्थितीत वराने ड्रेस घातला आणि हेल्मेट घालून वधूला दुचाकीवरून आणायला गेला. रामानुजगंजच्या सीमेवर पोलिस पथकाने वराला एकटे पाहिले तेव्हा पोलिस पथकही आश्चर्यचकित झाले.वराला थांबण्यास सांगितलेयानंतर पोलिसांनी वराला थांबवून विचारले की, आपण लग्न करणार आहात. हिंदू प्रथेनुसार किमान ५ लोक असावेत पण वर येथे फक्त एकटाच होता. पोलिस कर्मचाऱ्यांनी त्याचा लग्न करण्याचा आग्रह पाहून पोलीस त्याला म्हणाले किमान ५ जणांना बोलवा तरच आम्ही आमच्या उच्च अधिकाऱ्यांकडून जाण्याची परवानगी मिळवून देऊ. वराला पटले नाही आणि त्याला वाटले की ५ लोकांच्या चक्करमध्ये त्याचे लग्न मोडू नये. तो पोलिसांना नकार देऊन लग्नासाठी एकटाच निघून गेला.व्हिडिओ व्हायरल झाला आहेआता वराचा व्हिडिओ सोशल मीडियामध्ये जोरदार व्हायरल होत आहे. व्हायरल व्हिडिओत पोलिस त्याला समजावताना दिसत आहेत. वर म्हणाला की, कोरोना विषाणूमुळे गावातले लोक वरातीत सामील होणार नाहीत, त्यांना जबरदस्तीने कसे आणता येईल. त्याचवेळी, उपस्थित काही लोकांनी त्याचा व्हिडिओ बनविला आहे.

 

टॅग्स :Policeपोलिसcorona virusकोरोना वायरस बातम्याmarriageलग्नChhattisgarhछत्तीसगड