शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

पंजाबमध्ये माजी मंत्र्यांच्या घरावर ग्रेनेड हल्ला; पाकिस्तानातून आयएसआयने केला हल्ला, दोघांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2025 18:41 IST

पंजाबमध्ये माजी मंत्र्यांच्या घरावर ग्रेनेड हल्ल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

Punjab Crime: पंजाबचे माजी कॅबिनेट मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते मनोरंजन कालिया यांच्या घरावर काल रात्री दहशतवादी हल्ला झाला. ई-रिक्षातून आलेल्या काही लोकांनी त्याच्या घरात ग्रेनेड फेकला, ज्यामुळे मोठा स्फोट झाला. हल्ल्याच्या वेळी माजी मंत्री त्यांच्या घरात झोपले होते. त्यांच्यासोबत यावेळी त्यांचे कुटुंबिय देखील होते. या हल्ल्यामुळे परिसरात खबराट पसरली आहे. मात्र पंजाबपोलिसांनी १२ तासांच्या आत या प्रकरणाचा छडा लावून मुख्य आरोपीला अटक केली आहे.

पंजाबमधील जालंधरमध्ये भाजप नेते मनोरंजन कालिया यांच्या घरावर हल्ला झाला आहे. सोमवारी रात्री उशिरा जालंधरमधील शास्त्री मार्केट चौकात हा सगळा प्रकार घडला. सोमवारी रात्री १२:३० ते १:०० च्या दरम्यान भाजप नेते मनोरंजन कालिया यांच्या घरी ग्रेनेडचा स्फोट झाला. हल्ला झाल्याची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी भाजप नेत्याच्या घरासह संपूर्ण परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे तपासण्यास सुरुवात केली आहे. ई-रिक्षातून आलेल्या तिघांनी मनोरंजन कालिया यांच्या घरावर ग्नेनेड फेकला.

आता या हल्ल्याबाबत आता मोठी माहिती समोर आली आहे. पंजाब पोलिसांनी यांनी अवघ्या १२ तासांत ग्रेनेड हल्ल्याचा गुंता सोडवला आहे. या हल्ल्यातील मुख्य आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. तर हल्ल्यात वापरलेली ई-रिक्षा देखील जप्त करण्यात आली आहे. या हल्ल्यामागे एक मोठा कट होता ज्यामध्ये दहशतवादी आणि गुंडांच्या नेटवर्कचे संबंध उघडकीस आले आहेत. या हल्ल्याचा मास्टरमाइंड झीशान अख्तर आहे, जो कुख्यात गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचा जवळचा सहकारी आहे. पोलिसांना बाबा सिद्दीकींच्या हत्येप्रकरणात झीशान आधीपासून हवा होता.

या हल्ल्यातील पाकिस्तानस्थित खलिस्तानी दहशतवादी हरविंदर सिंग उर्फ ​​रिंडा आणि गँगस्टर हॅपी पासिया यांच्या संबंधांचाही पोलिस तपास करत आहेत. प्राथमिक तपासात हल्ला करण्यासाठी सूचना आणि पाठिंबा भारत-पाकिस्तान सीमेपलीकडून मिळाला होता अशी माहिती समोर आली आहे. जालंधर पोलिसांनी १२ तासांच्या आत २ ग्रेनेड फेकणाऱ्यांना अटक केली. रविंदर कुमार आणि सतीश उर्फ ​​काका उर्फ ​​लक्का यांना पोलिसांनी अटक केली आहे.

टॅग्स :PunjabपंजाबBlastस्फोटCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस