grenade attack in jammu and kashmirs Srinagar search operation underway | श्रीनगरच्या हाय सिक्युरिटी झोनमध्ये ग्रेनेड हल्ला; सर्च ऑपरेशन सुरू

श्रीनगरच्या हाय सिक्युरिटी झोनमध्ये ग्रेनेड हल्ला; सर्च ऑपरेशन सुरू

श्रीनगरमधील हाय सिक्युरिटी झोनमध्ये ग्रेनेड हल्ला झाला आहे. हरी सिंग मार्गावर सुरक्षा यंत्रणांना लक्ष्य करण्याच्या हेतूनं हा हल्ला करण्यात आला. सध्या या भागात सुरक्षा दलांनी सर्च ऑपरेशन सुरू केलं आहे. काश्मीर खोऱ्यातील परिस्थिती पूर्वपदावर आल्याची घोषणा प्रशासनाकडून करण्यात आल्यानंतर अवघ्या तीन तासांमध्ये श्रीनगरमध्ये हल्ला झाला आहे.हरी सिंग मार्गावरील लाल चौक भागात दुपारच्या सुमारास ग्रेनेड हल्ला झाला आहे. यामध्ये पाच जण जखमी झाले आहेत. लाल चौक परिसरात कायम मोठा फौजफाटा तैनात असतो. त्यामुळे संपक्षण दलांना लक्ष्य करण्यासाठीच हा हल्ला करण्यात आला असावा, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. ग्रेनेड हल्ल्याची माहिती मिळताच सुरक्षा दलाच्या अतिरिक्त तुकड्या घटनास्थळी पोहोचल्या. सध्या सुरक्षा दलांनी हा संपूर्ण परिसर ताब्यात घेतला असून जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: grenade attack in jammu and kashmirs Srinagar search operation underway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.