महाराणा प्रताप यांना अभिवादन

By Admin | Updated: June 2, 2014 08:55 IST2014-06-02T08:55:34+5:302014-06-02T08:55:34+5:30

नाशिक : महाराणा प्रताप बहुद्देशीय मंडळाच्या वतीने वीर राष्ट्रपुरुष महाराणा प्रताप यांची ४७४वी जयंती मुंबई नाका येथे साजरी करण्यात आली. याप्रसंगी महापौर ॲड. यतिन वाघ, आमदार वसंत गिते, स्थायी समिती अध्यक्ष रमेश धोंगडे, जयंती उत्सव समिती अध्यक्ष ॲड. प्रल्हाद पवार, मंडळाचे अध्यक्ष जितेंद्र सिसोदिया, धनंजय बेळे, रामसिंग बावरी, जयप्रकाश गिरासे, किशोर गिरासे, अमरदीप सिसोदिया, डॉ. संजय पाटील आदि उपस्थित होते.

Greetings to Maharana Pratap | महाराणा प्रताप यांना अभिवादन

महाराणा प्रताप यांना अभिवादन

शिक : महाराणा प्रताप बहुद्देशीय मंडळाच्या वतीने वीर राष्ट्रपुरुष महाराणा प्रताप यांची ४७४वी जयंती मुंबई नाका येथे साजरी करण्यात आली. याप्रसंगी महापौर ॲड. यतिन वाघ, आमदार वसंत गिते, स्थायी समिती अध्यक्ष रमेश धोंगडे, जयंती उत्सव समिती अध्यक्ष ॲड. प्रल्हाद पवार, मंडळाचे अध्यक्ष जितेंद्र सिसोदिया, धनंजय बेळे, रामसिंग बावरी, जयप्रकाश गिरासे, किशोर गिरासे, अमरदीप सिसोदिया, डॉ. संजय पाटील आदि उपस्थित होते.
-फोटो कॅप्शन : मुंबई नाका येथे महाराणा प्रताप यांना अभिवादन करताना महापौर ॲड. यतिन वाघ. समवेत आमदार वसंत गिते, रमेश धोंगडे, ॲड. प्रल्हाद पवार, जितेंद्र सिसोदिया, धनंजय बेळे, रामसिंग बावरी, जयप्रकाश गिरासे, किशोर गिरासे, अमरदीप सिसोदिया, डॉ. संजय पाटील आदि.
मोफत आरोग्य तपासणी शिबिर
सिडको : महाराणा प्रताप जयंतीनिमित्त विजयनगर येथील स्वामी क्रिटीकल हॉस्पिटलच्या वतीने मोफत आरोग्य शिबिर घेण्यात आले. या शिबिरात ११० नागरिकांनी आरोग्य तपासणीचा लाभ घेतला. प्रारंभी महाराणा प्रताप यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. हृदयरोगतज्ज्ञ डॉ. पंकज बिरारीस, डॉ. उल्हास कुटे, डॉ. सागर कासार, डॉ. जे. डी. आंधळे यांनी आरोग्य तपासणी केली. मनोज किल्लेदार, सुयश जगताप, ममता साहू, कोमल भोगे यांनी संयोजन केले.
फोटो - महाराणा प्रताप जयंतीनिमित्त सिडकोत आयोजित आरोग्य शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी प्रतिमापूजन करताना डॉ. पंकज बिरारीस, डॉ. सागर कासार, डॉ. उल्हास कुटे, डॉ. जे. डी. आंधळे आदि.
धनगर समाजाचा मेळावा उत्साहात
नाशिक : धनगर समाजाच्या आर्थिक, सामाजिक व शैक्षणिक विकासासाठी मोदी सरकार प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन उपमहापौर सतीश कुलकर्णी यांनी केले. पुण्यश्लोक अहल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त दिंडोरी तालुका भाजपा युवा मोर्चाच्या वतीने आयोजित धनगर समाजाच्या मेळाव्यात ते बोलत होते. मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी समाजाचे कार्यकर्ते रवींद्र ढेपले होते. याप्रसंगी व्ही. एन. नाईक शिक्षण संस्थेचे संचालक सुनील केदार, जिल्हा परिषद सदस्य प्रवीण जाधव, कादवाचे संचालक शहाजी सोमवंशी, भाजपा तालुका सरचिटणीस संजय कावळे, भाजयुमो सरचिटणीस ज्ञानेश्वर ढेपले, मनोज मोगरे, बाळासाहेब ढेपले, संजय सेंद्रे आदि उपस्थित होते. देवीदास वानले यांनी सूत्रसंचालन केले. नितीन मोगरे यांनी आभार मानले.
फोटो -दिंडोरी तालुका भाजपा युवा मोर्चाच्या वतीने आयोजित धनगर समाजाच्या मेळाव्यात बोलताना उपमहापौर सतीश कुलकर्णी. समवेत शहाजी सोमवंशी, मनोज मोगरे, सुनील केदार, प्रवीण जाधव, रवींद्र ढेपले आदि.

Web Title: Greetings to Maharana Pratap

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.