सुटकेस हरवल्याने स्वागत समारंभ हुकला

By Admin | Updated: September 20, 2014 01:27 IST2014-09-20T01:27:00+5:302014-09-20T01:27:00+5:30

केंद्रीय वित्त राज्यमंत्री निर्मला सितारमण यांची सुटकेस हरवल्यामुळे त्यांना जी-2क् मंत्र्यांच्या सन्मानार्थ आयोजित स्वागत समारंभाला मुकावे लागले.

The greeting was canceled after losing the suitcase | सुटकेस हरवल्याने स्वागत समारंभ हुकला

सुटकेस हरवल्याने स्वागत समारंभ हुकला

कैर्न्‍स : केंद्रीय वित्त राज्यमंत्री निर्मला सितारमण यांची सुटकेस हरवल्यामुळे त्यांना जी-2क् मंत्र्यांच्या सन्मानार्थ आयोजित स्वागत समारंभाला मुकावे लागले. 
पाम कोव्ह, कैर्न्‍स येथील स्वागत समारंभ हुकला याची चुटपुट लागून आहे. मी खोलीतच थांबलेली असून माङया सामानाबाबत अद्याप काहीही माहिती मला मिळालेली नाही, असे ट¦ीट सितारमण यांनी केले आहे. 
जी-2क् वित्तमंत्री, केंद्रीय बँक गव्हर्नरांच्या बैठकीत भारताचे प्रतिनिधित्व करण्यासाठी निर्मला सितारमण ऑस्ट्रेलिया दौ:यावर गेल्या आहेत. एअर इंडियाच्या विमानातून प्रवास करताना त्यांची सुटकेस हरवली. कैर्न्‍ससाठीचे संलग्न विमान पकडण्यासाठी मी सिडनीत उतरले तेव्हा मला माझी सुटकेस गहाळ झाल्याचे आढळून आले, असे सितारमण यांनी यापूर्वीच्या ट¦ीटमध्ये म्हटले होते. सध्या मी कैर्न्‍ससाठीच्या विमानात असून माझी सर्व परिधाने गहाळ झालेल्या सुटकेसमध्ये आहेत. कैर्न्‍समध्ये मला साडय़ा खरेदी करता येऊ शकतील काय याची खात्री नाही. परिस्थिती अत्यंत अवघड आहे. माझी सुटकेस मला वेळेत परत मिळेल अशी आशा आहे, असेही त्यांनी ट¦ीटमध्ये म्हटले आहे. जी 2क् बैठक 2क् व 21 सप्टेंबर रोजी होणार आहे. (वृत्तसंस्था)

 

Web Title: The greeting was canceled after losing the suitcase

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.