कोरोना रुग्णवाढीचा आलेख अनेक राज्यांत उतरणीला, देशात दुसरी लाट होतेय कमी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2021 06:06 AM2021-05-10T06:06:06+5:302021-05-10T06:10:53+5:30

सगळ्यात मोठा दिलासा मिळाला तो उत्तराखंडमधून. तेथे शनिवारी ८३९० रुग्ण होते. ते रविवारी ५८९० नोंदले गेले. या छोट्या राज्यात २५०० रुग्ण कमी झाले. कुंभमेळ्यात उत्तराखंडमध्ये दहशत वाटावी, असे रुग्ण वाढत होते.

The graph of corona morbidity is declining in many states, the second wave in the country is less | कोरोना रुग्णवाढीचा आलेख अनेक राज्यांत उतरणीला, देशात दुसरी लाट होतेय कमी

कोरोना रुग्णवाढीचा आलेख अनेक राज्यांत उतरणीला, देशात दुसरी लाट होतेय कमी

googlenewsNext

हरीश गुप्ता -
नवी दिल्ली : मोठी जीवितहानी घडवलेल्या कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेला महाराष्ट्र आणि दिल्लीनंतर अनेक राज्यांत उतार लागल्याचे दिसत आहे. ही लाट अनेक राज्यांत एक तर सपाट होताना किंवा तिचा आलेख खाली येताना दिसतो आहे. उत्तर प्रदेश, बिहार या फार मोठी लोकसंख्या असलेल्या राज्यांत गेल्या दोन दिवसांत कोरोना रुग्ण कमी होताना दिसत आहे आणि रविवारी त्या संख्येत लक्षणीय घट झाली. पश्चिम बंगालमध्ये रुग्णसंख्या सपाट होऊ लागली आहे.

सगळ्यात मोठा दिलासा मिळाला तो उत्तराखंडमधून. तेथे शनिवारी ८३९० रुग्ण होते. ते रविवारी ५८९० नोंदले गेले. या छोट्या राज्यात २५०० रुग्ण कमी झाले. कुंभमेळ्यात उत्तराखंडमध्ये दहशत वाटावी, असे रुग्ण वाढत होते. राजस्थान, गुजरात आणि मध्यप्रदेशमध्ये रुग्ण संख्येत रविवारी घसरण दिसली. या सगळ्याच राज्यांतून आणि केंद्रशासित प्रदेशांतील अंतिम आकडेवारी मध्यरात्रीनंतर मिळेल. या राज्यांत गेल्या आठवड्यात रुग्णसंंख्येत मोठी वाढ झाली होती त्यांना आता काहीसा दिलासा मिळू शकेल. लॉकडाऊन आणि प्रचंड प्रमाणावरील निर्बंधांमुळे रुग्णसंख्या वाढीची साखळी तुटण्याच्या मार्गावर आहे. रुग्णसंख्येत सर्वात लक्षणीय घट झाली ती केरळमध्ये. तेथे शनिवारी ४१ हजार ९७१ रुग्ण होते. ते दुसऱ्या दिवशी ३५८०१ नोंदले गेले.

- बिहार आणि गुजरातमध्येही गेल्या दोन दिवसांत रुग्णसंख्या कमी होताना दिसते आहे आणि मध्यप्रदेशमध्ये ही संख्या रविवारी ५५० ने कमी होऊन ११,०५१ वर आली. कर्नाटकमध्ये रविवारीही रुग्णवाढ कायम होती. तेथे महाराष्ट्रातील ४८४०१ रुग्णसंख्येच्या तुलनेत ४७९३० रुग्ण होते. रुग्णवाढीत कर्नाटक महाराष्ट्रालाही मागे टाकेल, असे दिसते.
 

Web Title: The graph of corona morbidity is declining in many states, the second wave in the country is less

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.