मुक्त गोठ्यांसाठी अनुदान देणार : माउली खंडागळे

By Admin | Updated: March 20, 2015 22:40 IST2015-03-20T22:40:15+5:302015-03-20T22:40:15+5:30

राजुरी : 'पशुसंवर्धनासाठी उपयोगी असलेल्या मुक्त गोठ्यांसाठी जिल्हा परिषदेतर्फे अनुदान उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करणार,' अशी ग्वाही जिल्हा परिषदेचे सदस्य माउली खंडागळे यांनी साळवाडी येथे दिली.

Grant of grants for free storages: Mauli Khandagale | मुक्त गोठ्यांसाठी अनुदान देणार : माउली खंडागळे

मुक्त गोठ्यांसाठी अनुदान देणार : माउली खंडागळे

जुरी : 'पशुसंवर्धनासाठी उपयोगी असलेल्या मुक्त गोठ्यांसाठी जिल्हा परिषदेतर्फे अनुदान उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करणार,' अशी ग्वाही जिल्हा परिषदेचे सदस्य माउली खंडागळे यांनी साळवाडी येथे दिली.
महाराष्ट्र शासनाच्या कामधेनू दत्तक योजना व पशुसंवर्धन तालुका लघू पशू चिकित्सालय शिरूर व पद्मावती पशुपालन मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने बोरी खुर्द, साळवाडी (ता. जुन्नर) येथे मोफत जनावरांचे सर्व रोग निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराच्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी जिल्हा दूध संघाचे अध्यक्ष बाळासाहेब खिलारी, साळवाडीचे सरपंच निवृत्ती काळे, दशरथ शिंदे, सुभाष बांगर, बाबाजी बांगर, सुनील पवार, मंगेश खिलारी, माउली शेटे, अश्विन पठाडे, कृषी अधिकारी पिचड मॅडम, डॉ. राणे पशुधन विकास अधिकारी डॉ. कोल्हे, सहायक आयुक्त डॉ. आंधळे आदी मान्यवर या वेळी उपस्थित होते.
खंडागळे म्हणाले, की दुग्ध व्यवसाय हा सर्वांना परवडणारा आहे. त्यामुळे तरुणांनी नोकरीच्या मागे न लागता हा व्यवसाय करावा. तसेच नवनवीन तंत्रज्ञान वापरून प्रगती कशी साधता येईल, याकडे लक्ष द्यावे.
जिल्हा दूध संघाचे अध्यक्ष खिलारी म्हणाले, की भविष्यात भारतात दुधाचे उत्पादन कमी होणार आहे. त्यामुळे या व्यवसायाला चांगले दिवस येणार आहे. बदलत्या काळानुसार दूधवाढीसाठी ज्या गोष्टी गरजेच्या आहेत त्याकडे लक्ष द्यावे. संरपच काळे म्हणाले, की पशुधन वाचवणे गरजेचे आहे. तसेच, शासनाच्या या योजनेचा सर्वांनी फायदा घ्यावा. या शिबिरामध्ये जनावरांचे वंधत्व निवारण गोचीड निर्मूलन या आजारांवर तपासणी व गो-पालन करताना येणार्‍या अडचणी या विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले.
फोटो : बोरी खुर्द साळवाडी ( ता.जुन्नर) चांगेश्वर मंदिराजवळ पशुरोग निदान शिबिराचे उद्घाटन करताना माउली खंडागळे व जिल्हा दूध संघाचे अध्यक्ष बाळासाहेब खिलारी.

Web Title: Grant of grants for free storages: Mauli Khandagale