शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
4
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
5
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
6
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार : संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
7
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
8
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
9
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
10
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
11
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
12
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
13
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
14
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
15
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
16
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
17
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
18
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
19
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
20
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
Daily Top 2Weekly Top 5

नातवंडे आजोबांच्या अंत्यदर्शनापासून वंचित

By admin | Updated: January 30, 2015 00:54 IST

- गो-एअरचे विमान रद्द : नातेवाईकांचा गोंधळनागपूर : कोलकातावरून पटणा येथे जाणारे गो-एअरचे विमान ऐनवेळी रद्द झाल्याने नातवंडांना आजोबांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेण्यापासून वंचित राहावे लागले. प्राप्त माहितीनुसार, संगमनगर येथील रहिवासी जीनत नय्यर हसन (३१) या मृताच्या स्नुषा आहेत. जीनत या मुलगी आयशा, निशा, मुलगा हसन आणि भाऊ मो. जावेद मलिक ...


- गो-एअरचे विमान रद्द : नातेवाईकांचा गोंधळ
नागपूर : कोलकातावरून पटणा येथे जाणारे गो-एअरचे विमान ऐनवेळी रद्द झाल्याने नातवंडांना आजोबांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेण्यापासून वंचित राहावे लागले.
प्राप्त माहितीनुसार, संगमनगर येथील रहिवासी जीनत नय्यर हसन (३१) या मृताच्या स्नुषा आहेत. जीनत या मुलगी आयशा, निशा, मुलगा हसन आणि भाऊ मो. जावेद मलिक यांच्यासोबत सकाळी ९.२० वाजता गो-एअरच्या जी ९-२९३ या विमानाने कोलकाता येथे रवाना झाल्या. त्यांना कोलकाता येथून गो-एअरच्या कनेटिंग जी ९-५४१ या विमानाने पटणा येथे जायचे होते. परंतु दुपारी २ वाजता कोलकाता विमानतळावर या विमानाचे उड्डाण ऐनवेळी रद्द झाले. कोलकाता येथे बहीण जीनत अडकल्याने नागपुरातील त्यांचे भाऊ मो. नौशाद हे मित्र शारिक जमा यांच्यासोबत डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचले. त्यांनी गो-एअरच्या काऊंटरवर उड्डाणाची विचारपूस केली. परंतु त्यांना उडवाउडवीची उत्तरे मिळाल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली आणि गोंधळ घातला. लोकमतशी बोलताना नौशाद यांनी सांगितले की, बहिणीच्या सासऱ्याचे पटणा येथे निधन झाले. नातेवाईकांच्या दर्शनासाठी त्यांच्या पार्थिवावर एक दिवस उशिरा अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय घेण्यात आला. या अंत्यविधीला उपस्थित राहण्यासाठी चार जणांनी गो एअर या विमान कंपनीचे नागपूर-कोलकाता आणि कोलकाता-पटणा असे कन्फर्म तिकीट काढले. पण कोलकाता येथे विमानाचे उड्डाण रद्द झाल्याने नातवंड आपल्या आजोबांचे अंतिम दर्शनापासून वंचित राहिले.