म्हाळसाकोरे येथे ग्रामपंचायत, सोसायटी निवडणुकीचे वेध
By Admin | Updated: December 23, 2014 00:56 IST2014-12-22T23:11:49+5:302014-12-23T00:56:17+5:30
म्हाळसाकोरे : येथील गावाच्या स्थानिक राजकारणाला कलाटणी देणारी, तालुकास्तरावरील गटातटाचा वेध घेणारी ग्रामपंचायत व सोसायटी या दोन प्रमुख संस्थांच्या पंचवार्षिक निवडणुका येत्या सहा महिन्यांत होणार आहेत. त्यादृष्टीने शासकीय पातळीवर माहिती घेण्याचे व मतदार याद्या दुरूस्तीचे काम सुरू झाले आहे. ग्रामपंचायत विद्यमान सरपंचपदाची निवडणूक २०१० मध्ये झाली. तिच्या इतिवृत्ताची नक्कल तहसील विभागाला पाठविण्यात आली आहे. आरक्षित व राखीव, सर्वसाधारण ????? सदस्यांचा अहवालही पाठविण्यात आला आहे. तसेच सहकार विभागातील सहकारी सोसायट्याच्या निवडणुका नवीन घटना दुरूस्ती व निवडणूक प्राधिकरणाकडून होणार असल्यान मुदतीनंतरही वर्षाचा कालावधी उलटला तरी या निवडणुका झाल्या नाहीत. त्या सर्व निवडणुका येत्या जुन दरम्यान घेण्यात येणार आहे.

म्हाळसाकोरे गावातील या दोन प्रमुख संस्थेच्या निवडणुका एकाच कालावधीत कधीच झालेल्या नाहीत. दोन वर्षाच्या अंतराने या निवडणुका होत आल्या परंतु २०१४ या नवीन वर्षात मात्र जून, जुलैदरम्यान या दोन्ही निवडणुका होण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे इच्छुकांना पूर्वतयारीच वेध लागले आहे. राष्ट्रवादी व शिवसेना व आजी-माजी आमदारांच्या गटात कार्यकर्ते असल्याने स्थानिक गट तट काहीसे जोरदार आहेत. (वार्ताहर)