ग्रामपंचायत सदस्यांचा सत्कार
By Admin | Updated: July 30, 2015 23:14 IST2015-07-30T23:14:06+5:302015-07-30T23:14:06+5:30
चाकण : विकासासाठी बेरजेचे राजकारण ही गुरुकिल्ली आहे. याच वैचारिकतेने ग्रामपंचायत बिनविरोध करण्याचा निर्णय शिवे ग्रामस्थांनी घेतला. तो अभिनंदनीय व अनुकरणीय आहे, असे मत खेडचे आमदार सुरेश गोरे यांनी व्यक्त केले.

ग्रामपंचायत सदस्यांचा सत्कार
च कण : विकासासाठी बेरजेचे राजकारण ही गुरुकिल्ली आहे. याच वैचारिकतेने ग्रामपंचायत बिनविरोध करण्याचा निर्णय शिवे ग्रामस्थांनी घेतला. तो अभिनंदनीय व अनुकरणीय आहे, असे मत खेडचे आमदार सुरेश गोरे यांनी व्यक्त केले.खेड तालुक्याच्या पिम प्यातील शिवे (ता. खेड) येथे ग्रामपंचायत निवडणूक २0१५ -२0 या कालावधीसाठी निवडून आलेल्या ग्रामपंचायत सदस्यांचा सत्कार आमदार गोरे यांच्या हस्ते झाला. त्या वेळी ते बोलत होते. याप्रसंगी जिल्हा परिषद सदस्य किरण मांजरे, शिवसेना उपजिल्हा प्रमुख शिवाजी वर्पे, सुभाष मांडेकर, प्रकाश वाडेकर, लक्ष्मण जाधव, ज्ञानेश्वर साळुंके, शांताराम शिवेकर, चांगदेव शिवेकर, आनंदा साकोरे, मारुती कोळेकर, रोहिदास गडदे, रमेश सोनवणे आदी उपस्थित होते.शिवे ग्रामपंचायतचे सदस्य आशा साकोरे, शांताराम शिवेकर, चंद्रकांत शिवेकर, सहिंद्रा जाधव, मीरा कोळेकर, मीना कोळेकर, सुनील बारवेकर, कविता सातपुते, शांताराम गडदे यांचा या वेळी आमदारांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.फोटो ओळ --- शिवे (ता. खेड) ग्रामपंचायतीच्या बिनविरोध झालेल्या सदस्यांचा सत्कार आमदार सुरेश गोरे यांच्या हस्ते करण्यात आला.