शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपाची बाजी : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विटरवरुन मानले 'महाराष्ट्राच्या जनतेचे आभार'

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2017 11:16 IST

महाराष्ट्रातील 16 जिल्ह्यांमधील 3 हजार 131  ग्रामपंचायतींच्या थेट सरपंचपदासह सदस्यपदांच्या सार्वत्रिक निवडणुकांचे निकाल सोमवारी (9 ऑक्टोबर) जाहीर झाले. त्यात बहुतांश ठिकाणी नव्या चेह-यांना सरपंच म्हणून काम करण्याची संधी मिळाली आहे.

नवी दिल्ली - महाराष्ट्रातील 16 जिल्ह्यांमधील 3 हजार 131  ग्रामपंचायतींच्या थेट सरपंचपदासह सदस्यपदांच्या सार्वत्रिक निवडणुकांचे निकाल सोमवारी (9 ऑक्टोबर) जाहीर झाले. त्यात बहुतांश ठिकाणी नव्या चेह-यांना सरपंच म्हणून काम करण्याची संधी मिळाली आहे. प्रस्थापित कुटंबांतील उमेदवारांना गावक-यांनी सुट्टी दिली. निवडणूक पक्षीय चिन्हावर झाली नसली तरी अनेक ठिकाणी भाजपाने बाजी मारल्याचे चित्र आहे. या पार्श्वभूमीवर, ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपाला मिळालेल्या यशाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ''महाराष्ट्रतील जनतेचे मन:पूर्वक आभार'' मानणारे ट्विट केले आहे.

भाजपाला ग्रामपंचायत निवडणुकीत विजय मिळवून देणाऱ्या महाराष्ट्रातील जनतेचे मनःपूर्वक आभार, असे ट्विट मोदींनी केले आहे.  याशिवाय मोदींनी महाराष्ट्र भाजपाचंही कौतुक केलं आहे. ''ग्रामीण भागातील जनतेचा, शेतकऱ्यांचा, तरुणांचा आणि गरिबांचा भाजपच्या विकासाच्या अजेंडाला पाठिंबा आहे, असंच हा विजय दर्शवत आहे'', असेही मोदींनी ट्विट केले आहे.  ''या विजयाबद्दल मी महाराष्ट्र भाजपा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचे अभिनंदन करतो'', असंही मोदी म्हणालेत.  

ग्रामपंचायत निवडणूक: सरपंचपदावर राजकीय दावेदारी

राज्याच्या १६ जिल्ह्यांमधील ३१३१ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचे निकाल सोमवारी जाहीर झाल्यानंतर आपल्याच पक्षाचे थेट सरपंच व ग्रामपंचायत सदस्य अधिक कसे निवडून आले यासाठी पक्षांमध्ये चढाओढ सुरू झाली आहे. ही निवडणूक चिन्हावर झालेली नसल्याने या दाव्यात कितपत सत्य आहे, याविषयी संशय आहे. ग्रामपंचायत निवडणुकीविषयी ‘ज्याच्या हाती ससा, तो पारधी’ या न्यायाने दावे-प्रतिदावे सुरू आहेत. यंदा प्रथमच थेट जनतेतून सरपंच निवडला गेल्याने राजकीय दावेदारी सुरू झाली आहे. एकेका ग्रामपंचायतीवर एकापेक्षा जास्त पक्षांनी दावा सांगितल्याचेही दिसून आले. स्थानिक विकास आघाड्या स्थापन करून राजकीय जोडे बाजूला ठेवतही अनेक ठिकाणी निवडणूक झाली. अशा कोणत्याही पक्षाच्या नसलेल्या सरपंच अन् सदस्यांना आपल्या तंबूत आणण्यासाठी स्थानिक मोठे नेते कामाला लागले आहेत.

केंद्र व राज्यात भाजपाची सत्ता असल्याने निधी मिळण्याच्या आशेने भाजपासोबत जाण्याकडेही अनेकांचा कल दिसतो. एक हजारावर ग्रामपंचायतींवर भाजपा समर्थक निवडून आल्याचा दावा भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी केला आहे. प्रदेश काँग्रेसकडून सांगण्यात आले की, आम्ही जिल्ह्याजिल्ह्यांतून माहिती गोळा करीत आहोत. भाजपाचे दावे खोटे आहेत हे आम्ही आकडेवारीनिशी सिद्ध करू. पूर्ण निकाल हाती आल्यानंतर आम्ही माहिती देऊ. तर अनेक ठिकाणी आम्हाला अत्यंत चांगले यश मिळाले असल्याचे शिवसेनेकडून सांगण्यात आले. राज्यातील सरपंचांचा सत्कार सोहळा लवकरच आयोजित करून भाजपा शक्तिप्रदर्शन करणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीMaharashtraमहाराष्ट्रMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार