शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
3
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
4
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
5
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
6
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
7
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
8
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
9
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
10
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
11
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
12
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
13
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
14
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
15
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
16
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
17
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
18
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण
19
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
20
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...

आणखी नऊ महिने पुरेल इतका देशात धान्यसाठा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2020 05:33 IST

रामविलास पासवान; जनतेने चिंता करू नये, आगामी काळात होणार गव्हाचे विक्रमी उत्पादन

नवी दिल्ली : सार्वजनिक शिधावाटप यंत्रणेचे लाभार्थी असलेल्या ८१ कोटी नागरिकांना आणखी नऊ महिने पुरेल इतका मोठा अन्नधान्य साठासध्या देशात आहे असे केंद्रीय अन्नपुरवठा मंत्री रामविलास पासवान यांनी सांगितले. आगामी काळात देशामध्ये गव्हाचेही विक्रमी उत्पादन होण्याची शक्यता असून, त्याचीही अन्नधान्याच्या साठ्यात भर पडणार आहे.

कोरोनाचा आणखी फैलाव होऊ नये म्हणून केंद्र सरकारने लागू केलेल्या २१ दिवसांच्या लॉकडाऊनची मुदत उद्या, १४ एप्रिलच्या मध्यरात्रीनंतर आणखी वाढण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर रामविलास पासवान म्हणाले की, कोरोना साथीच्या काळात देशामध्ये अन्नधान्याची वाहतूक व वाटप अतिशय कार्यक्षमतेने झाले असून ही ऐतिहासिक कामगिरी आहे. १० एप्रिलपर्यंतच्या आकडेवारीनुसार सरकारी गोदामांमध्ये सध्या तांदळाचा २९९.४५ लाख मेट्रिक टन, गव्हाचा २३५.३३ लाख मेट्रिक टन इतका मोठा साठा आहे. सार्वजनिक शिधावाटप यंत्रणेद्वारे देशात दर महिन्याला ६० मेट्रिक टन अन्नधान्याचे वाटप केले जाते. त्यामध्ये डाळींचाही समावेश आहे.‘अंत्योदय’च्या लाभार्थींना ५ किलो जादा धान्यकोरोना संकटाच्या काळात सार्वजनिक शिधावाटप यंत्रणेच्या सर्व लाभार्थींना तीन महिन्यांचे अन्नधान्य एकाचवेळी व तेही मोफत देण्यात येईल, अशी घोषणा केंद्राने याआधीच केली आहे. अंत्योदय योजनेच्या लाभार्थींना दर महिन्याला ३५ किलो अन्नधान्य शिधावाटप यंत्रणेद्वारे देण्यात येते; पण आता त्यांना आणखी पाच किलो अन्नधान्य देण्यात येणार आहे.या वर्षातील पहिल्या ३ महिन्यांत असलेला साठा (आकडे लाख मेट्रिक टनमध्ये)अन्न जानेवारी फेब्रुवारी मार्चतांदूळ २३७.१५ २७४.५१ ३०९.७६गहू ३२७.९६ ३०३.६६ २७५.२१अन्न जानेवारी फेब्रुवारी मार्चधान २७८.८७ २५८.९६ २८७.०८भरड धान्य ३.२४ ३.२४ ०.२४

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याfoodअन्न