शिवोलीतील जखमीचे गोमेकॉत निधन
By Admin | Updated: January 20, 2016 01:51 IST2016-01-20T01:51:34+5:302016-01-20T01:51:34+5:30
हणजूण : शिवोली येथे झालेल्या दुचाकी अपघातातील जखमीचे आज गोमेकॉत निधन झाले.

शिवोलीतील जखमीचे गोमेकॉत निधन
ह जूण : शिवोली येथे झालेल्या दुचाकी अपघातातील जखमीचे आज गोमेकॉत निधन झाले.दि. 17 रोजी शिवोली पुलावर पहाटे 4.30च्या सुमारास जीए 03-टी 7211 या व्ॉगनर गाडीला जीए 03-एबी 1889 या मॅस्ट्रो स्कूटरने धडक दिली. या धडकेमुळे स्कूटरचालक रोशनराज मोहनराज नायडू (23) हा बंगळुरू येथील पर्यटक रस्त्यावर फेकला गेला. या अपघातात तो गंभीर जखमी झाला. पोलिसांनी त्याला 108 रुग्णवाहिकेद्वारे प्रथम जिल्हा रुग्णालयात व नंतर गोमेकॉत नेले. तेथे उपचार सुरू असताना मंगळवारी त्याचा मृत्यू झाला. हणजूण पोलीस स्थानकाचे उपनिरीक्षक प्रताप देसाई यांनी शवचिकित्सेनंतर मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन केला. (वार्ताहर)