शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
2
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
3
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
6
नव्या भारताकडे दहशवाद्यांना मातीत गाडण्याची अन् शत्रूला घरात घुसून संपवण्याची क्षमता- योगी आदित्यनाथ
7
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
8
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
9
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
10
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
11
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
12
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
13
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
14
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
15
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
16
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
17
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
18
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
19
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
20
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!

दिवाळीत सरकार तुमच्या खात्यात जमा करणार ८१,००० रुपये, तारीख जाहीर, असं करा चेक 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2022 15:07 IST

EPFO Balance : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना EPFO च्या ७ कोटी सब्स्क्रायबर्सना या महिन्याच्या अखेरीपर्यंत मोठी खूशखबर मिळणार आहे. सरकार EPF खातेधारकांच्या खात्यामध्ये २०२२ च्या आर्थिक वर्षाचे व्याज जमा करणार  आहे.

नवी दिल्ली - पीएफ खातेधारकांना सणावारांच्या दिवसांत खूशखबर आली आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना EPFO च्या ७ कोटी सब्स्क्रायबर्सना या महिन्याच्या अखेरीपर्यंत मोठी खूशखबर मिळणार आहे. सरकार EPF खातेधारकांच्या खात्यामध्ये २०२२ च्या आर्थिक वर्षाचे व्याज जमा करणार  आहे. यावेळी ८.१ टक्के दराने व्याज मिळणार आहे. या महिन्याच्या अखेरीस ही रक्कम खात्यात जमा होण्याची शक्यता असल्याचे सांगण्यात येत आहे. या वर्षीचा व्याजदर हा ४० वर्षांमधील सर्वात निचांकी पातळीवरील व्याजदर आहे. 

जर तुमच्या पीएफ खात्यामध्ये १० लाख रुपये जमा असतील तर व्याजाच्या रूपात तुम्हाला ८१ हजार रुपये मिळतील. जर तुमच्या खात्यामध्ये ७ लाख रुपये असतील तर तुम्हाला ५६ हजार ७०० रुपये मिळतील. जर तुमच्या खात्यामध्ये पाच लाख रुपये असतील तर तुम्हाला व्याजाच्या रूपात ४० हजार ५०० रुपये मिळतील. तसेच जर तुमच्या खात्यामध्ये एक लाख रुपये असतील तर तुमच्या खात्यामध्ये ८ हजार १०० रुपये जमा होतील.

जर तुम्हाला पीएफमधील रक्कम तपासायची असल्यास तुम्हाला तुमच्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवरून ०११-२२९०१४०६ वर मिसकॉल द्यावा लागेल. त्यानंतर ईपीएफओच्या मेसेजच्या माध्यमातून पीएफची माहिती मिळेल. इथेही तुम्हाला तुमचं यूएन, पॅन आणि आधारकार्ड लिंक असणं आवश्यक आहे.

तसेच तुम्ही तुमचा बॅलन्स हा ऑनलाइन, उमंग अॅपवरून आणि एसएमएसच्या माध्यमातूनही तपासू शकता. एसएमएसवरून बॅलन्स तपासण्यासाठी तुम्हाला तुमच्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवरून 7738299899 वर EPFOHO  लिहून मेसेज करावा लागेल. त्यानंतर तुम्हाला तुमच्या बॅलन्सची माहिती मिळेल. 

टॅग्स :Provident Fundभविष्य निर्वाह निधीMONEYपैसाCentral Governmentकेंद्र सरकार