शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळवर बोलण्यापूर्वी पक्षाची परवानगी घ्या; वादानंतर भाजपचे सर्व मंत्री, नेते अन् इतरांना निर्देश
2
'पोलंडमध्ये रशियाची घुसखोरी चुकीची, हे सर्व लवकरच संपेल'; ट्रम्प यांनी नाराजी व्यक्त केली, फ्रान्सने राफेल पाठवले
3
PPF अकाऊंट होल्डरचा अचानक मृत्यू झाल्यास कशी होईल सेटलमेंट? रक्कम मॅच्युअर होण्याची वाट पाहावी लागेल का?
4
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
5
नेपाळचा पुढचा पंतप्रधान कोण? जेन झी तरुणांची राष्ट्राध्यक्ष रामचंद्र पौडेल यांच्याशी दुसऱ्यांदा चर्चा
6
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
7
नवरा सुपरस्टार तरीही पाय जमिनीवर, गर्वाचा लवलेशही नाही; भरत जाधव यांच्याप्रमाणेच त्यांची पत्नीही आहे अगदी साधी
8
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
9
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
10
कोकणातला 'कांतारा' रंगला की फसला? कसा आहे दिलीप प्रभावळकरांचा 'दशावतार' सिनेमा? वाचा रिव्ह्यू
11
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
12
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
13
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
14
बुलेट ट्रेनच्या १५७ किमीवरील कामांसाठी महत्त्वाकांक्षी करार, मुंबई-अहमदाबाद प्रवास होणार वेगाने
15
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल
16
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
17
व्होटबंदी : साप मेला नाही; पण दात काढले!
18
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
19
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
20
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...

UGC NET postponed: कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर UGC NET परीक्षा पुढे ढकलली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2021 17:58 IST

२ मेपासून पार पडणार होत्या परीक्षा. NTA नं जारी केलं पत्रक

ठळक मुद्दे२ मेपासून पार पडणार होत्या परीक्षा.

NTA UGC NET Exam 2021 postponed: गेल्या काही दिवसांपासून कोरोनानं पुन्हा एकजा डोकं वर काढण्यास सुरूवात केली आहे. देशात काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधितांची नोंद होत आहे. या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय घेत UGC NET ही परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सीनं मंगळवारी २० एप्रिल रोजी पत्रक काढून याबाबत माहिती दिली. केंद्रीय शिक्षण मंत्री डॉ. रमेश पोखरियाल निशंक यांनी यासंदर्भातील ट्वीट केलं आहे. २०२० सायकलसाठी (मे २०२१) UGC NET ही परीक्षा २ मे ते १७ मे २०२० या कालावधीत कंम्प्युटर मोडमध्ये होणार होती. परंतु सध्याची परिस्थिती आमि विद्यार्थ्यांच्या आरोग्याकडे पाहता पुन्हा एकदा ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे, असं एनटीएनं जारी केलेल्या पत्रकात म्हटलं आहे.  सध्या ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली असली तरी केव्हा घेतली जाईल याची माहिती देण्यात आलेली नाही. परीक्षेच्या १५ दिवस अगोदर विद्यार्थ्यांना परीक्षेच्या नव्या तारखांबाबत माहिती दिली जाईल. असंही एनटीएनं सांगितलं. तसंच एनटीए आणि युजीसीची वेबसाईटही पाहत राहण्याच्या सूचना विद्यार्थ्यांना करण्यात आल्या आहेत. या परीक्षेसंदर्भात कोणत्याही प्रकारची अधिक माहिती घेण्यासाठी एनटीएचा हेल्पलाईन क्रमांक 011-40759000 यावर संपर्क साधू शकता. तसंच ugcnet@nta.ac.in यावर ईमेल पाठवूनही माहिती घेता येईल. 

टॅग्स :examपरीक्षाcorona virusकोरोना वायरस बातम्याEducationशिक्षण