शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

मोदी सरकार सरदार पटेल यांच्या नावे देणार सर्वोच्च नागरी पुरस्कार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2019 15:52 IST

केंद्र सरकार भारताची एकता आणि अखंडतेसाठी महत्त्वाचं योगदान देणाऱ्या व्यक्तीच्या यथोचित गौरवासाठी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या नावाने सर्वोच्च नागरी पुरस्कार देणार आहे.

ठळक मुद्देसरदार पटेल राष्ट्रीय एकता पुरस्कार असल्याची माहिती केंद्र सरकारने दिली आहे. पदक आणि प्रशस्तीपत्रक प्रदान करुन गौरव करण्यात येणार आहे.राष्ट्रीय एकता दिवस म्हणजेच सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीला या पुरस्कारांची घोषणा केली जाणार

नवी दिल्ली - केंद्र सरकार भारताची एकता आणि अखंडतेसाठी महत्त्वाचं योगदान देणाऱ्या व्यक्तीच्या यथोचित गौरवासाठी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या नावाने सर्वोच्च नागरी पुरस्कार देणार आहे. सरदार पटेल राष्ट्रीय एकता पुरस्कार असल्याची माहिती केंद्र सरकारने दिली आहे. तसेच पदक आणि प्रशस्तीपत्रक प्रदान करुन गौरव करण्यात येणार आहे. विशेष अपवाद वगळता हे पुरस्कार मरणोत्तर प्रदान केले जाणार नाहीत. या पुरस्कारासोबत कोणतीही रोख रक्कम महत्त्वाचं योगदान देणाऱ्या व्यक्तींना दिली जाणार नाही. 

राष्ट्रीय एकता दिवस म्हणजेच सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीला (31 ऑक्टोबर) या पुरस्कारांची घोषणा केली जाणार आहे. गृह मंत्रालयाने याआधीही सरदार पटेल राष्ट्रीय एकता पुरस्कार सुरू करण्याबाबत अधिसूचना जारी केली होती. राष्ट्रीय एकता आणि अखंडतेला प्रोत्साहन देण्यासाठी आणि अखंड भारताचे मूल्य अधिक सुदृढ करणं हा यामागचा मुख्य उद्देश आहे. राष्ट्रपतींच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान केला जाणार आहे. पद्म पुरस्कारांप्रमाणेच राष्ट्रपती भवनात सोहळा आयोजित करुन महत्त्वाचं योगदान देणाऱ्या व्यक्तींचा सन्मान केला जाणार आहे.

पंतप्रधानांकडून पुरस्कार समिती स्थापन केली जाईल. यामध्ये मंत्रिमंडळ सचिव, पंतप्रधानांचे प्रधान सचिव, राष्ट्रपतींचे सचिव, गृह सचिव सदस्य असतील. याशिवाय पंतप्रधानांनी नियुक्त केलेले तीन-चार जणही या समितीवर निवडले जातील. भारतातील कोणतीही संस्था किंवा संघटना किंवा भारतीय नागरिक या पुरस्कारासाठी योग्य व्यक्तीचं नामांकन करू शकतो. तसेच एखादी व्यक्ती स्वत: चं नाव देखील नामांकन म्हणून देऊ शकते. राज्य सरकार, केंद्रशासित राज्यातील प्रशासन, मंत्रालयही नामांकन पाठवू शकतात. दरवर्षी पुरस्कारासाठी अर्ज मागवले जातील. गृहमंत्रालयाने तयार केलेल्या वेबसाईटवर ऑनलाईन अर्ज सादर केले जाऊ शकतात. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

कलम 370 हटवल्यामुळे सरदार वल्लभभाई पटेल यांचे स्वप्न साकार केल्याचे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याआधी केले आहे. सरदार वल्लभभाई पटेल यांनी देशाच्या एकात्मतेसाठी महत्त्वाचे निर्णय घेतले. मात्र, कलम 370 मुळे त्यांचे स्वप्न साकार होऊ शकत नव्हते. सध्या ‘एक राष्ट्र, एक संविधान’ या घोषणेची गरज असून 370 आणि कलम 35 ए हटवल्यामुळे वल्लभभाई पटेल यांचे स्वप्न साकार होण्याकडे एक पाऊल टाकले असल्याचं पंतप्रधान मोदी यांनी म्हटलं होतं.  

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीIndiaभारत