शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
2
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
3
धावत्या लोकलमध्ये सशस्त्र हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू; कल्याण रेल्वे पोलिसांनी दोघांना केली अटक
4
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
5
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
6
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
7
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
8
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
9
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
10
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा
11
रस्ता बांधल्यावरुन चीनला भारताने चांगलेच खडसावले; शक्सगाम खोरे हा आमचा भाग, केला दावा
12
सूर्यापेक्षा दीडपट दूरवरुन आला पृथ्वीवर सिग्नल; नासाच्या ‘सायके’ यानाची यशस्वी कामगिरी
13
भूषण पाटील दहा कोटींचे धनी; मालमत्तेत साडेसहा कोटींची वाढ
14
श्रीकांत शिंदेंकडे ७.५ कोटींची संपत्ती; वाहने नाहीत, सातारा जिल्ह्यात शेती
15
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
16
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
17
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
18
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
19
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
20
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य

केंद्राचा मोठा निर्णय; पाकिस्तान, बांगलादेश, अफगाणिस्तानातून आलेल्या मुस्लिमेतर व्यक्तींना मिळू शकणार नागरिकत्व

By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2021 4:24 PM

केंद्राकडून नागरिकांना अर्ज करण्याचं आवाहन, अधिसूचना जारी

ठळक मुद्देकेंद्राकडून नागरिकांना अर्ज करण्याचं आवाहनकेंद्र सरकारनं जारी केली अधिसूचना

केंद्र सरकारनं पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तानमधून आलेल्या मुस्लिमेतर नागरिकांबद्दल मोठा निर्णय घेतला आहे. या देशातून आलेल्या निर्वासितांकडून भारतीय नागरिकत्वासाठी अर्ज मागवण्यात आले आहे. २८ मे रोजी केंद्रानं यासंदर्भातील निर्णय घेतला आहे. या देशांमधून आलेल्या हिदू, जैन, शीख, पारशी आणि बौद्ध धर्मीय नागरिक जे गुजरात, राजस्थान, छत्तीसगढ, हरियाणा आणि पंजाबच्या १३ जिल्ह्यांमध्ये राहत आहेत, त्यांच्याकडून अर्ज मागवण्यात आले आहेत.केंद्रीय गृहमंत्रालयाचनं नागरिकत्व कायदा १०५५ आणि अंतर्गत वर्ष २००९ मध्ये मागवण्यात आलेल्या कायद्यांतर्गत हा निर्णय घेतला आहे. तसंच हे त्वरित लागू करण्यासाठी अधिसूचनाही जारी करण्यात आली आहे. दरम्यान, याचा सीएए (CAA) या कायद्याशी कोणत्याही प्रकारचा संबंध नाही. सीएएशी निगडीत नियम अद्याप तयार करण्यात आलेले नाहीत.नागरिकत्व कायदा १९५५ च्या कलम १६ अंतर्गत प्राप्त अधिकारांचा वापर करून केंद्र सरकारनं ही अधिसूचना जारी केली आहे. या कायद्याच्या कलम ५ अंतर्गत पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि बांगलादेशातील अल्पसंख्याकांना भारतीय नागरिक म्हणून नोंदणी करता येईल किंवा कलम ६ अंतर्गत भारतीय नागरिकत्वाचे प्रमाणपत्र दिलं जाऊ शकते.या प्रकारे होईल प्रक्रियाकेंद्राने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार गुजरातमधील मोरबी, राजकोट, पाटण, बडोदे, छत्तीसगडमधील दुर्ग आणि बालोदबाजार, राजस्थानमधील जालोर, उदयपुर, पाली, बाडमेर आणि सिरोही, हरियाणामधील फरीदाबाद आणि पंजाबमधील जालंधर येथे राहणारे बिगर हिंदू निर्वासित नागरिकत्वासाठी अर्ज करू शकतात. हे अर्ज ऑनलाइन पद्धतीनं केले जातील.या अर्जांची पडताळणी राज्यस्तरीय व जिल्हा पातळीवर करण्यात येईल. राज्याचे गृहसचिव किंवा जिल्हाधिकारी यांना यानंतर हे अर्ज आणि अहवाल केंद्र सरकारला त्वरित ऑनलाइन पोर्टलवर उपलब्ध करुन द्यावे लागतील. ऑनलाइन व्यतिरिक्त जिल्हाधिकारी किंवा सचिव एक ऑफलाइन म्हणजेच एक रजिस्टरही तयार करतील. यामध्ये भारतीय नागरिकांच्या रूपात त्यांच्याकडे अर्ज करणाऱ्या निर्वासितांची माहितीही असेल. याची एक प्रत त्यांना सात दिवसांच्या आत केंद्र सरकारला पाठवावी लागेल.

टॅग्स :IndiaभारतPakistanपाकिस्तानBangladeshबांगलादेशAfghanistanअफगाणिस्तानHinduहिंदूMuslimमुस्लीम