शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानसोबत मॅच खेळायची असेल तर पहलगाममध्ये मारला गेलेला माझा भाऊ परत आणून द्या"
2
'ऑपरेशन सिंदूरदरम्यान काँग्रेस पाकिस्तानी सैन्याच्या बाजूने होती', पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
3
"मी शिव भक्त, सर्व विष गिळून टाकतो...", पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; म्हणाले...
4
पाकिस्तानविरुद्ध खेळण्यास देशातून तीव्र विरोध, टीम इंडिया दबावात, ड्रेसिंग रूममधून आली अशी बातमी
5
Video - अग्निकल्लोळ! गुजरातच्या संघवी ऑर्गेनिक्स फॅक्ट्रीमध्ये भीषण आग, धुराचं साम्राज्य
6
BMW ने कार आणि बाईक्सच्या किमतीत केली मोठी कपात; तब्बल ₹१३.६ लाखांची होणार बचत...
7
सोन्याची विक्रमी झेप! आठवड्यात ३,३०० रुपयांनी महागले; चांदीचाही नवा उच्चांक, आजचा दर काय?
8
टीम इंडियाला धक्का! पाकिस्तानविरूद्धच्या सामन्याआधी शुबमन गिलच्या हाताला दुखापत, अपडेट काय?
9
Sushila Karki: 'आम्ही सत्तेचा आस्वाद घेण्यासाठी आलेलो नाही, ६ महिन्यांतच...' पंतप्रधान सुशीला कार्की 'अ‍ॅक्शन मोड'मध्ये!
10
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
11
तुमचे LPG गॅस सिलेंडरचे अनुदान बंद झाले? घरबसल्या मोबाईलवरुन करता येईल सुरू
12
अलर्ट मोड ऑन! फेस्टिव्ह सेलच्या स्वस्ताईला भुलू नका; एक चूक अन् गमवाल आयुष्यभराची कमाई
13
शेतकऱ्यांनो, दिवाळीआधी PM किसानचा २१वा हप्ता येणार का? वाचा कधी जमा होणार पैसे?
14
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
15
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
16
लोकप्रिय 'दामिनी' मालिका पुन्हा येतेय प्रेक्षकांच्या भेटीला, ही अभिनेत्री मुख्य भूमिकेत, या चॅनेलवर होणार प्रसारण
17
चालकाचं नियंत्रण सुटलं अन् कार थेट उड्डाणपुलावरून खाली रेल्वे रुळावर पडली!
18
निम्न तेरणा प्रकल्पातून ७६३६ क्युसेक पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
19
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
20
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी

३ राज्यातील ७ जिल्ह्यांना मोदी सरकारचं गिफ्ट; ६४०० कोटींच्या रेल्वे प्रकल्पांना मान्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2025 17:21 IST

वाहतुकीतील गुंतवणुकीमुळे देशातील लॉजिस्टिक्स खर्च सुमारे ४ टक्क्यांनी कमी झाला आहे असं आयआयएम बंगळुरू आणि आयआयएम कोलकाता यांच्या अलिकडच्याच एका अभ्यासातून दिसून आले असंही रेल्वेमंत्र्यांनी म्हटलं. 

नवी दिल्ली - केंद्रीय कॅबिनेट बैठकीत बुधवारी झारखंड, कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातील ७ जिल्ह्यांमध्ये भारतीय रेल्वेच्या २ मल्टीट्रॅकिंग योजनांना मंजुरी देण्यात आली आहे. केंद्र सरकारच्या या पाऊलामुळे प्रवास सुविधेत सुधारणा होईल. लॉजिस्टिक खर्च कमी होईल. कार्बन डायऑक्साईड उत्सर्जनात घट होईल ज्यातून टिकाऊ आणि कुशल रेल्वे संचालनाला चालना मिळेल.

रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी म्हटलं की, कोडरमा ते बरकाकाना या दरम्यान १३३ किमी डबल लेनला मंजुरी मिळाली आहे. ज्याचा खर्च ३०६३ कोटी इतका आहे. त्यातून पटणा आणि रांची यांच्यातील अंतर कमी होईल. यामुळे कोडरमा, चतरा, हजारीबाग, रामगड जिल्ह्याला चांगली कनेक्टिविटी मिळू शकते. या प्रकल्पातून निर्माण होणारे कार्बन डायऑक्साइडचे प्रमाण सात कोटी झाडे लावण्याइतके असेल. यामुळे देशातील दरवर्षी ३२ कोटी लिटर डिझेलची बचत होईल. याचा फायदा ९३८ गावांना आणि १५ लाख लोकसंख्येला होईल. त्यातून ३०.४ दशलक्ष टन अतिरिक्त मालवाहतूक होऊ शकते  जे रस्त्याने वस्तू पाठवण्यापेक्षा पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून चांगले ठरेल असं त्यांनी सांगितले. 

बल्लारी-चिकजाजूर मल्टीट्रॅकिंग प्रकल्पाला मंजुरी

त्याशिवाय केंद्र सरकारने कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातील भारतीय रेल्वेच्या बेल्लारी चिकजापूर मल्टिट्रॅकिंग प्रकल्पालाही मंजुरी दिली आहे. इथेही डबल लेन केली जाईल. ज्यातून मंगळुरू पोर्टहून थेट कनेक्टिविटी तयार होईल. या प्रकल्पामुळे १८५ किमी रेल्वे लाईन डबलिंग केले जाईल. ज्याला ३३४२ कोटी इतका खर्च असेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या तिसऱ्या कारकि‍र्दीत परिवहन आणि लॉजिस्टिक खर्च कमी करण्याच्या दृष्टीने रेल्वे अनेक प्रकल्प आणत आहे. वाहतुकीतील गुंतवणुकीमुळे देशातील लॉजिस्टिक्स खर्च सुमारे ४ टक्क्यांनी कमी झाला आहे असं आयआयएम बंगळुरू आणि आयआयएम कोलकाता यांच्या अलिकडच्याच एका अभ्यासातून दिसून आले असंही रेल्वेमंत्र्यांनी म्हटलं. 

दरम्यान, २८ मे रोजी केंद्र सरकारने धान, कापूस, सोयाबीन, तूर यासह १४ खरीप पिकांच्या किमान आधारभूत किमतीत (MSP) वाढ केली होती. धानाची नवीन एमएसपी २,३६९ रुपये निश्चित करण्यात आली, जी मागील एमएसपीपेक्षा ६९ रुपये जास्त आहे. कापसाचा नवीन एमएसपी दर ७,७१० रुपये निश्चित करण्यात आला होता.

टॅग्स :railwayरेल्वेNarendra Modiनरेंद्र मोदीJharkhandझारखंडKarnatakकर्नाटक