शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

केळकर संग्रहालयाला शासनाकडून आर्थिक निधी देण्याचा प्रयत्न करेन- राज्यपाल विद्यासागर राव यांचे आश्वासन

By admin | Updated: August 13, 2015 22:34 IST

पुणे : राजा दिनकर केळकर संग्रहालयाने उत्कृष्ट पारंपारिक शिल्पे, कलाकुसर आणि भारतीय संस्कृतीचे जतन चांगल्या पद्धतीने केले आहे, असा अभिप्राय देत संग्रहालयाला शासनाकडून जास्तीत जास्त निधी मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल असे आश्वासन राज्यपाल सी. विद्यासागर यांनी गुरूवारी दिले.

पुणे : राजा दिनकर केळकर संग्रहालयाने उत्कृष्ट पारंपारिक शिल्पे, कलाकुसर आणि भारतीय संस्कृतीचे जतन चांगल्या पद्धतीने केले आहे, असा अभिप्राय देत संग्रहालयाला शासनाकडून जास्तीत जास्त निधी मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल असे आश्वासन राज्यपाल सी. विद्यासागर यांनी गुरूवारी दिले.
राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी काल राजा दिनकर केळकर संग्रहालयाला भेट दिली. त्यांनी संग्रहालयातील विविध दालनांची पाहणी करून संग्रहालयाच्या संचालक मंडळाशी संवाद साधला. याप्रसंगी पालकमंत्री गिरीश बापट, विभागीय आयुक्त चोक्कलिंगम, राज्यपालांचे सचिअ बी.वेणू गोपाल रेड्डी, जिल्हाधिकारी सौरभ राव, उपसचिव परिमल सिंह, एडीसी सुचीत मेहरोत्रा, डॉ. दिनकर केळकर यांच्या कन्या रेखा रानडे, संग्रहालयाचे संचालक सुधान्वा रानडे , संग्रहालयाच्या संचालक मंडळाचे सदस्य डॉ. गो.बं देगूलरकर, सदस्य संजीव साठे उपस्थित होते.
राव यांनी डॉ. दिनकर केळकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला. त्यानंतर त्यांनी संग्रहालयातील गुजरात दालन, वस्त्र दालन, दिव्यांचे दालन, मूर्ती आणि साहित्यांचे दालन, वीणा, शहनाई आदी वाद्यांचे विविध प्रकार असलेले दालन, मस्तानी महाल, हस्तीदंत दालन आदी दालनांना भेट दिली. त्यांना संचालक सुधान्वा रानडे व संग्रहालयाच्या शीतल पवार यांनी दुर्मिळ वस्तुंबाबत माहिती दिली. त्यानंतर संचालक मंडळाशी संग्रहालयाच्या अडीअडचणी संदर्भात त्यांनी चर्चा केली. रानडे यांनी संग्रहालयाच्या मागण्यांचे निवेदन दिले. यावर संग्रहालयाला शासनाकडून अधिक मदत मिळवून देण्यासाठी पूर्ण प्रयत्न केले जातील, अशी ग्वाही त्यांनी दिली.