केळकर संग्रहालयाला शासनाकडून आर्थिक निधी देण्याचा प्रयत्न करेन- राज्यपाल विद्यासागर राव यांचे आश्वासन
By Admin | Updated: August 13, 2015 22:34 IST2015-08-13T22:34:36+5:302015-08-13T22:34:36+5:30
पुणे : राजा दिनकर केळकर संग्रहालयाने उत्कृष्ट पारंपारिक शिल्पे, कलाकुसर आणि भारतीय संस्कृतीचे जतन चांगल्या पद्धतीने केले आहे, असा अभिप्राय देत संग्रहालयाला शासनाकडून जास्तीत जास्त निधी मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल असे आश्वासन राज्यपाल सी. विद्यासागर यांनी गुरूवारी दिले.

केळकर संग्रहालयाला शासनाकडून आर्थिक निधी देण्याचा प्रयत्न करेन- राज्यपाल विद्यासागर राव यांचे आश्वासन
प णे : राजा दिनकर केळकर संग्रहालयाने उत्कृष्ट पारंपारिक शिल्पे, कलाकुसर आणि भारतीय संस्कृतीचे जतन चांगल्या पद्धतीने केले आहे, असा अभिप्राय देत संग्रहालयाला शासनाकडून जास्तीत जास्त निधी मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल असे आश्वासन राज्यपाल सी. विद्यासागर यांनी गुरूवारी दिले.राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी काल राजा दिनकर केळकर संग्रहालयाला भेट दिली. त्यांनी संग्रहालयातील विविध दालनांची पाहणी करून संग्रहालयाच्या संचालक मंडळाशी संवाद साधला. याप्रसंगी पालकमंत्री गिरीश बापट, विभागीय आयुक्त चोक्कलिंगम, राज्यपालांचे सचिअ बी.वेणू गोपाल रेड्डी, जिल्हाधिकारी सौरभ राव, उपसचिव परिमल सिंह, एडीसी सुचीत मेहरोत्रा, डॉ. दिनकर केळकर यांच्या कन्या रेखा रानडे, संग्रहालयाचे संचालक सुधान्वा रानडे , संग्रहालयाच्या संचालक मंडळाचे सदस्य डॉ. गो.बं देगूलरकर, सदस्य संजीव साठे उपस्थित होते. राव यांनी डॉ. दिनकर केळकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला. त्यानंतर त्यांनी संग्रहालयातील गुजरात दालन, वस्त्र दालन, दिव्यांचे दालन, मूर्ती आणि साहित्यांचे दालन, वीणा, शहनाई आदी वाद्यांचे विविध प्रकार असलेले दालन, मस्तानी महाल, हस्तीदंत दालन आदी दालनांना भेट दिली. त्यांना संचालक सुधान्वा रानडे व संग्रहालयाच्या शीतल पवार यांनी दुर्मिळ वस्तुंबाबत माहिती दिली. त्यानंतर संचालक मंडळाशी संग्रहालयाच्या अडीअडचणी संदर्भात त्यांनी चर्चा केली. रानडे यांनी संग्रहालयाच्या मागण्यांचे निवेदन दिले. यावर संग्रहालयाला शासनाकडून अधिक मदत मिळवून देण्यासाठी पूर्ण प्रयत्न केले जातील, अशी ग्वाही त्यांनी दिली.