राज्यपाल नारायणन यांचा सीबीआयकडून जबाब
By Admin | Updated: June 28, 2014 01:36 IST2014-06-28T01:36:21+5:302014-06-28T01:36:21+5:30
ऑगस्टा वेस्टलँड व्हीव्हीआयपी हेलिकॉप्टर खरेदी घोटाळाप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) पश्चिम बंगालचे राज्यपाल एम. के. नारायणन यांचा साक्षीदार म्हणून जबाब घेतला.

राज्यपाल नारायणन यांचा सीबीआयकडून जबाब
>नवी दिल्ली : ऑगस्टा वेस्टलँड व्हीव्हीआयपी हेलिकॉप्टर खरेदी घोटाळाप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) पश्चिम बंगालचे राज्यपाल एम. के. नारायणन यांचा साक्षीदार म्हणून जबाब घेतला.
सीबीआय 36क् कोटी रुपयांच्या लाच प्रकरणाची चौकशी करीत आहे. या प्रकरणात सीबीआयला नारायणन आणि गोव्याचे राज्यपाल बी. व्ही. वांचू यांचा जबाब नोंदवायचा होता. विरोध असतानादेखील 2क्13 मध्ये संपुआ सरकारने हा खरेदी व्यवहार केला होता.
ऑगस्टा वेस्टलँडला हेलिकॉप्टरचा पुरवठा करण्याचे कंत्रट देण्यासाठी निकषांमध्ये फेरबदल करण्यात आल्याचा दावा सीबीआयचा आहे. 2क्क्5 मध्ये हेलिकॉप्टरच्या तांत्रिक निकषांमध्ये सुधारणा करण्यात आली. यावेळी नारायणन हे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार होते. सीबीआयला वांचू यांचादेखील जबाब नोंदवायचा आहे. राज्यपाल म्हणून नियुक्ती होण्यापूर्वी ते विशेष सुरक्षा गट (एसपीजी) चे प्रमुख होते. हेलिकॉप्टरच्या निकषांमध्ये बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्या बैठकीत वांचू उपस्थित होते. सीबीआयने या प्रकरणात भारतीय हवाई दलाचे तत्कालीन प्रमुख एस.पी. त्यागी आणि इतर 13 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. (वृत्तसंस्था)