मेस्सीला पाहण्यासाठी इतकं महागडं तिकीट, राज्यपाल संतापले; राज्य सरकारकडून मागवला रिपोर्ट
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2025 13:19 IST2025-12-13T13:18:35+5:302025-12-13T13:19:06+5:30
राज्यपास बोस यांनी मेस्सी याच्या कोलकाला दौऱ्याच्या नियोजनावरून राज्य सरकारवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.

मेस्सीला पाहण्यासाठी इतकं महागडं तिकीट, राज्यपाल संतापले; राज्य सरकारकडून मागवला रिपोर्ट
कोलकाता - पश्चिम बंगालचे राज्यपाल सी.वी आनंद बोस यांनी शनिवारी कोलकातामध्ये अर्जेटिनाचा फुटबॉलपटू लियोनेल मेस्सी याच्या कार्यक्रमावरू राज्य सरकारला पत्र लिहून सविस्तर अहवाल मागवला आहे. अनेक फुटबॉल चाहत्यांनी लोकभवनात फोन करू तिकीटाच्या किंमतीवर नाराजी व्यक्त केली. कोलकातामध्ये आयोजित केलेल्या कार्यक्रमात आपल्या आवडत्या खेळाडूची एक झलक पाहण्यासाठी शेकडो चाहते तरसले होते. मात्र तिकीटाचे दर इतके महाग होते, ज्यामुळे या लोकांना मेस्सीला पाहण्यापासून वंचित राहावे लागले. लोकांच्या या तक्रारीनंतर राज्यपालांनी राज्य सरकारकडे रिपोर्ट मागवला आहे.
राज्यपास बोस यांनी मेस्सी याच्या कोलकाला दौऱ्याच्या नियोजनावरून राज्य सरकारवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. लोकांच्या भावनांच्या किंमतीवर कमाई करण्याची परवानगी का दिली गेली असा प्रश्न राज्यपालांनी विचारला आहे. याबाबत लोकभवनातील एक अधिकारी म्हणाले की, लोकभवनात सातत्याने फुटबॉल चाहत्यांचे फोन आणि ईमेल येत आहेत, ज्यात मेस्सी याच्या मॅचचे तिकीट इतके महागडे आहे की इच्छा असूनही त्यांना ते खरेदी करता येत नाही. असं का झाले हे राज्यपालांना जाणून घ्यायचे आहे. जेव्हा एखादा लोकप्रिय खेळाडू भारतात येत असेल तर सामान्य लोकांना त्याला का पाहता येत नाही असं राज्यपालांनी विचारल्याचे त्यांनी सांगितले.
मेस्सीने सॉल्ट लेक स्टेडियममध्ये आयोजित एका सन्मान सोहळ्याला हजेरी लावली. जिथे संगीत, नृत्य कार्यक्रमासोबतच मोहन बागान मेस्सी ऑल स्टार्स आणि डायमंड हार्बर मेस्सी ऑल स्टार्स यांच्या एक मॅच खेळली जाणार होती. मात्र या कार्यक्रमाला केवळ तिकिटांमुळे ज्या लोकांनी जास्त किंमत दिली ते काहीच लोक या प्रसिद्ध फुटबॉलपटूला पाहू शकतील यावर राज्यपाल हैराण झाले. राज्यपाल यांनी राज्य सरकारला पत्र लिहून मेस्सीच्या दौऱ्यातून लाभ मिळवू पाहणाऱ्या त्या व्यक्तीबाबत सविस्तर रिपोर्ट मागितला आहे. सामान्य लोकांना मेस्सीला पाहण्यापासून का रोखले असंही त्यांनी विचारले. मेस्सीला पाहण्यासाठी चाहत्यांना १० लाख रूपये मोजावे लागत आहेत.
दरम्यान, मेस्सी त्याचा दीर्घकाळचा स्ट्राईक पार्टनर लुईस सुआरेझ आणि अर्जेंटिनाचा सहकारी खेळाडू रॉड्रिगो डी पॉल यांच्यासोबत भारतात आला आहे. लुईस सुआरेझ, रॉड्रिगो डी पॉल आणि चित्रपट अभिनेता शाहरुख खान कोलकाता येथील कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहेत. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि इतर मान्यवरांनाही आमंत्रित करण्यात आले आहे.