७५ रुपयांचे नाणे सरकार आज जारी करणार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2023 06:06 IST2023-01-28T06:06:34+5:302023-01-28T06:06:49+5:30

पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी दिल्लीतील करिअप्पा परेड मैदानावर एनसीसीच्या वार्षिक रॅलीला सायंकाळी ५.४५ वाजता संबोधित करणार आहेत.

Government will issue 75 rupees coin today | ७५ रुपयांचे नाणे सरकार आज जारी करणार 

७५ रुपयांचे नाणे सरकार आज जारी करणार 

नवी दिल्ली :

पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी दिल्लीतील करिअप्पा परेड मैदानावर एनसीसीच्या वार्षिक रॅलीला सायंकाळी ५.४५ वाजता संबोधित करणार आहेत. यावर्षी एनसीसी स्थापनेचे ७५ वे वर्ष साजरे करत आहे. त्यानिमित्त पंतप्रधान मोदी ७५ रुपयांचे स्मृती नाणे जारी करणार आहेत. यात एक भारत श्रेष्ठ भारत या थीमवर सांस्कृतिक कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात आले आहे. वसुधैव कुटुंबकमच्या  भावनेतून, १९ देशांतील १९६ अधिकारी आणि कॅडेट्सनाही या समारंभात सहभागी होण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. 

नॅशनल कॅडेट कॉर्प्स आणि राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवकांना संबोधित करताना मोदी बुधवारी म्हणाले, तुम्ही तरुण आहात, तुमचे भविष्य घडवण्याची वेळ आली आहे. तुम्ही नवीन कल्पना आणि नवीन मानकांचे निर्माते आहात. तुम्ही नव्या भारताचे आश्रयदाता आहात. 

Web Title: Government will issue 75 rupees coin today