शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

काय सांगता? 'या' सरकारकडून मुलीला लग्नात 1 तोळं सोन्याची भेट; जाणून घ्या कसा होणार लाभ

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2020 12:35 IST

Arundhati Gold Scheme : सरकारने मुलीच्या लग्नात तिला भेट देण्यासाठी एक नवी योजना सुरू केली आहे.

नवी दिल्ली - आपल्या लाडक्या लेकीचं लग्न थाटामाटात, धुमधडाक्यात व्हावं अशी प्रत्येक आई-वडिलांची इच्छा असते. त्यामुळेच मुलीच्या जन्मापासूनच ते तिच्यासाठी थोडे थोडे पैसे जमा करायला सुरुवात करतात. मात्र आता मुलींच्या पालकांसाठी एक खूशखबर आहे. आसाम सरकारने मुलीच्या लग्नात तिला भेट देण्यासाठी एक नवी योजना सुरू केली आहे. आसाम सरकारने अरुंधती गोल्ड स्कीम (Arundhati Gold Scheme) नावाच्या एका योजनेचा शुभारंभ केला आहे. या योजनेंतर्गत मुलींना विवाहात सरकारकडून 10 ग्रॅम सोनं म्हणजेच एक तोळं सोनं भेट म्हणून देण्यात येणार आहे.

गरीब पालकांना अरुंधती गोल्ड स्कीमचा मोठा फायदा होणार आहे, आर्थिकदृष्या कमकुवत असणाऱ्या कुटुंबांना यामुळे थोडी मदत होणार आहे. इच्छा असूनही केवळ परिस्थितीमुळे मुलींना मदत न करू शकणाऱ्या कुटुंबांना या योजनेचा लाभ घेता येईल अशी माहिती सरकारच्या वतीने देण्यात आली आहे. सरकारकडून मुलींसाठी अनेक योजना राबवण्यात येतात. यातील शिक्षणाच्या सुविधांचा अधिकाधिक फायदा पालकांना घेता येईल. यामध्ये आता अरुंधती गोल्ड स्कीमची भर पडली आहे. यामुळे मुलींच्या विवाहाच्या वेळी सरकारकडून 10 ग्रॅम सोनंही मिळणार आहे.

जाणून घ्या कसा आणि कोणाला होणार लाभ

अरुंधती सुवर्ण योजनाचा लाभ अशा कुटुंबांना घेता येईल ज्यांना एक किंवा दोन मुली आहेत. मात्र तीन किंवा त्यांहून अधिक मुली असतील तर या योजनेचा लाभ घेता येणार नाही. या योजनेचा लाभ तेव्हाच घेता येईल जेव्हा विवाहावेळी मुलीचं वय 18 वर्षांहून अधिक आणि मुलाचं वय 21 वर्षांहून अधिक असेल. तसेच योजनेचा लाभ घेण्यासाठी मुलीच्या कुटुंबीयांचं वार्षिक उत्पन्न पाच लाखांहून कमी असायला हवं. त्याहून अधिक उत्पन्न असल्यास या योजनेचा फायदा मिळणार नाही. 

मुलींच्या पालकांसाठी खूशखबर! सरकारकडून विवाहासाठी मिळणार 10 ग्रॅम सोनं

सरकारकडून मुलींच्या विकासासाठी, त्यांच्या अधिकाराच्या संरक्षणासाठी विविध योजना या सुरू केल्या आहेत. त्यातीलच ही एक उपयुक्त योजना आहे. अरुंधती गोल्ड स्कीमचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला शासनाकडे माहितीसह एक अर्ज दाखल करावा लागणार आहे. आसाम सरकारने गेल्या वर्षी ही योजना सुरू केली होती. सरकारच्या या योजनेने मोठी मदत होणार असल्याने कौतुक होत आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

टॅग्स :GoldसोनंAssamआसामmarriageलग्न