सरकार वेळोवेळी गरिबांसाठी नवीन योजना आणत राहते, जेणेकरून लोकांना त्याचा जास्तीत जास्त फायदा घेता येईल. यावेळी सरकारने रेशनकार्डधारकांसाठी एक नवीन योजना आणली. या योजनेंतर्गत रेशनकार्डधारकांना धान्यासह दरमहा १ हजार रुपये दिले जाणार आहेत.
सरकारने रेशनकार्डधारकांसाठी एक नवीन योजना जाहीर केली. या योजनेचा फायदा मोठ्या प्रमाणात लोकांना होईल, अशी अपेक्षा आहे. विशेषतः ज्या कुटुंबांची आर्थिक परिस्थिती चांगली नाही, त्यांच्यासाठी ही योजना सर्वात फायदेशीर ठरू शकते. कारण या योजनेंतर्गत गरीब कुटुंबांना अन्नधान्यासोबतच दरमहा १ हजार दिले जाणार आहेत. या योजनेचा उद्देश केवळ गरीब कुटुंबांना मोफत रेशन देणे नाही तर, गरीब आणि गरजू कुटुंबांना आर्थिक मदत करणे आहे. या योजनेचा लाभ फक्त त्या लोकांनाच मिळेल, जे सरकारने ठरवून दिलेल्या निकषांची पूर्तता करतील.
निकषसरकारच्या या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराला राज्याच्या अन्न आणि नागरी पुरवठा वेबसाइटला भेट द्यावी लागेल. अर्ज करण्याची प्रक्रिया खूप सोपी आहे. अर्ज करण्यासाठी रेशन कार्ड, आधार कार्ड, बँक पासबुकची प्रत, उत्पन्नाचा दाखला, रहिवासी प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. ही योजना १ जून २०२५ पासून सुरू होईल.
असा करा कर्ज- सर्वातप्रथम, राज्य अन्न आणि नागरी पुरवठा वेबसाइटला भेट द्या. - त्यानंतर रेशन कार्ड नवीन योजना २०२५ या पर्यायावर क्लिक करा.- रेशन कार्ड क्रमांक आणि इतर तपशील भरा आणि कागदपत्रे अपलोड करा.- यानंतर फक्त अर्ज सबमिट करा.