शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विदान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
3
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
4
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
5
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
6
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
7
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
8
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
9
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
10
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
11
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
12
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
13
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
14
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
15
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
16
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
17
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
18
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
19
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले
20
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं

मोठी बातमी : 59 चिनी अ‍ॅप्सवरील बंदीनंतर आणखी 20 अ‍ॅप्सवर टांगती तलवार; सरकार केव्हाही घालू शकतं बंदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2020 15:07 IST

नवी दिल्ली - तब्बल 59 चिनी अ‍ॅप्सवर बंदी घातल्यानतंर सरकार आता आणखी 20 अ‍ॅपच्या डेटा शेअरिंग पॉलिसीची समीक्षा करत ...

ठळक मुद्देसरकार आता आणखी 20 अॅपच्या डेटा शेअरिंग पॉलिसीची समीक्षा करत आहे.सरकार ज्या 20 अॅपवर डाटा शेअरिंग पॉलिसीची समीक्षा करत आहे, त्यात अनेक गेमिंग अॅप्सचादेखील समावेश आहे. आयटी मंत्रालय काही वेबसाइट्सवरही बंदी घालू शकते.

नवी दिल्ली - तब्बल 59 चिनी अ‍ॅप्सवर बंदी घातल्यानतंर सरकार आता आणखी 20 अ‍ॅपच्या डेटा शेअरिंग पॉलिसीची समीक्षा करत आहे. सीएनबीसी आवाजने दिलेल्या वृत्तानुसार, ज्या कंपन्यांचे सर्व्हर चीनमध्ये आहेत, त्या कंपन्यांवर बंदी घातली जाऊ शकते. एवढेच नाही, तर आयटी मंत्रालय काही वेबसाइट्सवरही बंदी घालू शकते. सरकार ज्या 20 अ‍ॅपवर डाटा शेअरिंग पॉलिसीची समीक्षा करत आहे, त्यात अनेक गेमिंग अ‍ॅप्सचादेखील समावेश आहे.

भारतात 59 चिनी अ‍ॅप्स बॅन -नुकतेच केंद्र सरकारने इन्फॉर्मेशन टेक्नोलॉजी अ‍ॅक्ट, 2000 (IT Act, 2020)च्या सेक्शन 69A नुसार 59 चीनी अ‍ॅप्सवर बंदी घातली आहे. लडाखमधील गलवान खोऱ्यातील सीमेवर भारत-चीन तणाव मोठ्या प्रमाणावर वाढल्यानंतर भारत सरकारने हे पाऊल उचलले.

लष्करातील अधिकाऱ्यांनाही 89 अ‍ॅप्स डेलीट करण्याचा आदेश -याशिवाय सरकारने भारतीय सैन्य दलांतील अधिकाऱ्यांना आणि सैनिकांना फेसबूक-इंस्टाग्राम अकाउंट्स डेलीट करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. याशिवाय इतर 89 अ‍ॅप्सची यादीही जारी करण्यात आली आहे. जे अ‍ॅप्स मोबाईलमधून अनइंस्टॉल करण्यास सांगण्यात आले आहे. आदेशानुसार, हे अ‍ॅप्स सर्वांना 15 जुलैपर्यंत डेलीट करायचे आहेत. यामध्ये वुईचॅट, हाईकसारखी मेसेंजर अ‍ॅप्स, पब्जीसारखे गेमिंग अ‍ॅप्स, डेटिंग अ‍ॅपमध्ये टिंडर, ओकेक्युपीड आदी अ‍ॅप्स, तसेच डेली हंट या न्यूज अ‍ॅपचाही समावेश आहे. 

अमेरिकेचंही भारताच्या पावलावर पाऊल?आम्ही चिनी अ‍ॅपवर बंदी घालण्याच्या विचारात असल्याचे परराष्ट्रमंत्री माईक पॉम्पियो यांनी म्हटले आहे. ऑस्ट्रेलियामध्येही चिनी अ‍ॅपवर बंदी घालण्याची मागणी जोर धरू लागली आहे. त्यामुळे लवकरच चीनला मोठा आर्थिक फटका बसण्याची शक्यता आहे. एकट्या भारतातल्या बंदीमुळे टिकटॉकला जवळपास ६ अब्ज डॉलर्सचे नुकसान होत आहे. यामध्ये आता आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.

महत्त्वाच्या बातम्या -

CoronaVirus News: कोरोना व्हायरसवरील सर्वात प्रभावी, सुरक्षित अन् स्वस्त औषध 'Dexamethasone'; संशोधकांचा दावा

CoronaVirus : कोरोना व्हॅक्सीनवर एकाच दिवसात दोन 'गुड न्‍यूज'; 'या' देशाची व्हॅक्सीन फक्त एक पाऊल दूर

खुशखबर...! औषध सापडलं...! एड्सबाधित रुग्ण झाला ठणठणीत; वैज्ञानिकांचा दावा

कोरोना तर पहिली लाट; जगाला भोगावे लागतील दूरगामी परिणाम - चीनची धमकी

ड्रॉप होऊ शकते कोरोना व्हॅक्सीनची तिसरी ट्रायल? ICMRच्या वरिष्ठ वैज्ञानिकानं दिलं असं उत्तर

टॅग्स :MobileमोबाइलGovernmentसरकारITमाहिती तंत्रज्ञानTik Tok Appटिक-टॉकchinaचीनCentral Governmentकेंद्र सरकार