उसासाठी सरकारी मूल्य 230 रुपये प्रति क्विंटल
By Admin | Updated: August 23, 2014 01:53 IST2014-08-23T01:53:10+5:302014-08-23T01:53:10+5:30
कृषी खर्च आणि मूल्य आयोगाने 2क्15-16 (ऑक्टोबर-सप्टेंबर) या ऊस लागवड वर्षासाठी साखरेचे उचित व किफायतशीर मूल्य 230 रुपये प्रतिक्विंटल करण्याची शिफारस केली आहे.

उसासाठी सरकारी मूल्य 230 रुपये प्रति क्विंटल
नवी दिल्ली : कृषी खर्च आणि मूल्य आयोगाने 2क्15-16 (ऑक्टोबर-सप्टेंबर) या ऊस लागवड वर्षासाठी साखरेचे उचित व किफायतशीर मूल्य 230 रुपये प्रतिक्विंटल करण्याची शिफारस केली आहे. या घटनात्मक आयोगाद्वारे सरकारला प्रमुख कृषी उत्पादनांच्या किमान मूल्याबाबत सल्ला दिला जातो.
कृषी खर्च आणि मूल्य आयोगाने यासंदर्भातील आपला अहवाल केंद्रीय अन्न मंत्रलयाला सोपविला आहे. एका वरिष्ठ अधिका:याने सांगितले की, आयोगाने 2क्15-16 या वर्षासाठी उसाला प्रति क्विंटल 23क् रुपये एफआरपी देण्याची शिफारस केली आहे.
यंदाच्या एफआरपीच्या तुलनेत यात 1क् रुपयांची वाढ करण्यात आली आहे. सरकारने ऑक्टोबरपासून सुरू होणा:या 2क्14-15 च्या हंगामासाठी उसाचे मूल्य 22क् रुपये निश्चित केले आहे. 2क्15-16 साठी आयोगाचा एफआरपीशी संबंधित अहवाल पुढील सत्रत घोषित केला जाईल.
सीएसपीसीच्या या अहवालात 9.5 टक्के साखरेचा उतारा असलेल्या उसासाठी 23क् रुपये प्रतिक्विंटल भाव देण्याची शिफारस केली आहे. 1क्.5 टक्के उतारा असलेल्या उसाकरिता 243 रुपये एफआरपी देण्याचा सल्ला दिला आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)
4कारखानदारांना ऊस उत्पादकांना द्यावा लागणारा किमान दर म्हणजे उचित व किफायतशीर मूल्य अर्थात एफआरपी होय. तथापि, राज्य सरकारला यापेक्षा अधिक मूल्य घोषित करण्याची सूट आहे. कारखानदारही एफआरपीपेक्षा कितीही मूल्य देऊ शकतात. वाहतूक खर्चासह ऊस उत्पादन खर्चाच्या आधारावर शेतक:यांचा नफा ध्यानात घेऊन एफआरपी निश्चित केला जातो.