प्रियंका चोप्रावर आसाम सरकारने उडवले 3.37 कोटी

By Admin | Updated: May 10, 2017 14:42 IST2017-05-10T13:16:53+5:302017-05-10T14:42:30+5:30

बॉलीवूडची देसी गर्ल प्रियंका चोप्रावर आसाम सरकारने 2.37 कोटी रुपये खर्च केले आहेत.

The government flown over Priyanka Chopra at 3.37 crores | प्रियंका चोप्रावर आसाम सरकारने उडवले 3.37 कोटी

प्रियंका चोप्रावर आसाम सरकारने उडवले 3.37 कोटी

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि., 10 - बॉलीवूडची देसी गर्ल प्रियंका चोप्रावर आसाम सरकरने 2.37 कोटी रुपये खर्च केले आहेत. गेल्या वर्षी प्रियंका चोप्रा आसाम राज्याची ब्रँड अ‍ॅम्बॅसिडर झाली होती. प्रियंकाच्या एका ट्रीपसाठी आसाम सरकारने 2.37 कोटी रुपये मोजले आहेत. काल विधानसभेत विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना पर्यटनमंत्री हेमंत बिस्व यांनी ही माहिती दिली.

आसामचे पर्यटन मंत्री हेमंत बिस्व यांनी विधानसभेत दिलेल्या माहितीनुसार, गेल्या वर्षी प्रियंका चोप्राची आसामच्या ब्रँड अ‍ॅम्बॅसिडर पदी नियुक्ती करण्यात आली आहे. ही नियुक्ती दोन वर्षासाठी आहे. पण यासाठी वर्षाला प्रियंका चोप्राचे मानधन किती असेल हे ठरवण्यात आलेले नाही. मास्टर ब्लास्ट सचिन तेंडुलकरने आसाम राज्याच्या ब्रँड अ‍ॅम्बॅसिडर साठी नकार दिल्यानंतर देसी गर्ल प्रियंकाची वर्णी लागली होती.

गेल्या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणूकीत भाजपाने 126 जागांपैकी 60 जागांवर विजय मिळवला होता. उत्तरेकडील राज्यात भाजपाने पहिल्यांदाच आपले सरकार स्थापन केलेले आहे. आसामचे मुख्यमंत्री सरबानंद सोनोवाल आहेत.

Web Title: The government flown over Priyanka Chopra at 3.37 crores