शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणवर रात्रीच हल्ला? नेतन्याहू यांच्या विमानाचं हवेत उड्डाण; ५० ठिकाणं अमेरिकेच्या हिटलिस्टवर
2
इराण-अमेरिका युद्धाची शक्यता? तेहरानच्या इशाऱ्यानंतर कतारमधील अमेरिकन हवाई तळ केले रिकामे
3
ट्रम्प यांच्या टॅरिफवर आज कोणताही निर्णय नाही, अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाची सुनावणी दुसऱ्यांदा पुढे ढकलली
4
Daryl Mitchell च्या शतकासह यंगची 'विल पॉवर'! टीम इंडियावर पलटवार करत न्यूझीलंडनं साधला बरोबरीचा डाव
5
Daryl Mitchell Hundred : डॅरिल मिचेलची कडक सेंच्युरी; किंग कोहलीच 'नंबर वन' स्थान धोक्यात!
6
अमेरिकेने केली इराणची कोंडी, चारही बाजूंनी घेरले; 'या' देशांमध्ये लष्करी तळ...
7
हजारीबागमध्ये भीषण बॉम्ब ब्लास्ट, तिघांचा मृत्यू, एकजण गंभीर जखमी
8
अमेरिकेच्या टॅरिफ धोरणावर आज रात्री फैसला; ट्रम्प यांच्याविरोधात निकाल गेल्यास काय घडू शकतं?
9
शिंदेंच्या उमेदवाराच्या घरावर मतदानाआधी दगडफेक; खिडक्या फोडल्या, खुर्च्या तोडल्या, प्रचंड राडा
10
मैत्री मैत्रीच्या ठिकाणी...! युद्धात इराणला साथ देणार नाही चीन? कारण काय?
11
धक्कादायक ! नागपुरात बाप झाला सैतान,पत्नीकडे ताबा जाऊ नये म्हणून पोटच्या मुलीची हत्या
12
लहानपणीची गोंडस मुलगी आता झालीये सुपरहॉट, रेड बॅकलेस ड्रेसमध्ये सारा अर्जुनचा किलर लूक!
13
"JJD हा लालूंचा खरा पक्ष"; राजद विलीनीकरणावर तेजप्रताप यांची तेजस्वींना थेट ऑफर
14
Petrol कार्सच्या तुलनेत Diesel कार्स जास्त मायलेज का देतात? जाणून घ्या यामागील विज्ञान...
15
बांगलादेशचा आडमुठेपणा! भारतात टी-२० वर्ल्डकप खेळण्यास नकार; आता आयसीसीकडे आहेत ३ पर्याय!
16
IND vs NZ : हर्षित राणानं ऑफ स्टंप उडवत डेवॉन कॉन्वेचा केला करेक्ट कार्यक्रम! गंभीरने अशी दिली दाद
17
मुस्लिमबहुल प्रभागांत रंगणार काँग्रेस-एमआयएम सामना! १३ जागांसाठी काँग्रेसची धडपड, शिंदेसेना चारही जागा राखणार?
18
डोंबिवलीत भाजपा अन् शिंदेसेनेत जोरदार राडा; ५ जणांना अटक, जखमींवर रुग्णालयात उपचार
19
Video - ई-रिक्षातील तरुणाचं अश्लील कृत्य; रणरागिणीने रस्त्यावरच घडवली चांगलीच अद्दल
20
"विना परवाना शस्त्र वाटणार, ज्याला हवं त्याने..."; योगी सरकारच्या मंत्र्याचं धक्कादायक विधान
Daily Top 2Weekly Top 5

मोठी बातमी : सरकारने रद्द केली तब्बल ४ कोटी ३९ लाख रेशनकार्ड

By बाळकृष्ण परब | Updated: November 9, 2020 09:08 IST

Ration Cards News : सार्वजनिक वितरण व्यवस्था आधुनिक बनवण्यासाठी आणि त्याच्या परिचालनामध्ये पारदर्शकता आणि कुशलता आणण्यासाठी अनेक पावले उचलण्यात आली आहेत.

ठळक मुद्देअन्न आणि नागरी पुरवठा विभागाने एनएफएसएच्या अंतर्गत योग्य लाभार्थ्यांची ओळख पटवण्यासाठी २०१३ पासून तब्बल ४ कोटी ३९ लाख बोगस रेशन कार्ड रद्द केली रद्द करण्यात आलेल्या रेशनकार्डच्या बदल्यात खऱ्या आणि योग्य लाभार्थ्यांना किंवा कुटुंबांना नियमित पद्धतीने रेशनकार्ड जारी करण्यात आली आहेतसध्या देशातील ८० कोटींहून अधिक लोकांना केंद्र सरकारकडून उपलब्ध करण्यात आलेले धान्य खरेदी करतात

नवी दिल्ली - अन्न आणि नागरी पुरवठा विभागाने एनएफएसएच्या अंतर्गत योग्य लाभार्थ्यांची ओळख पटवण्यासाठी २०१३ पासून तब्बल ४ कोटी ३९ लाख बोगस रेशन कार्ड रद्द केली आहेत. रद्द करण्यात आलेल्या रेशनकार्डच्या बदल्यात खऱ्या आणि योग्य लाभार्थ्यांना किंवा कुटुंबांना नियमित पद्धतीने रेशनकार्ड जारी करण्यात आली आहेत. देशभरात तंत्रज्ञानाच्या मदतीने पीडीएस सुधारणा करण्यासाठी लक्षित अभियानांतर्गत एनएफएसए लागू करण्याची तयारी सुरू आहे. त्यादरम्यान, सार्वजनिक वितरण व्यवस्था आधुनिक बनवण्यासाठी आणि त्याच्या परिचालनामध्ये पारदर्शकता आणि कुशलता आणण्यासाठी अनेक पावले उचलण्यात आली आहेत.रेशन कार्ड आणि लाभार्थ्यांच्या डाटाबेसचे डिजिटायझेशन केल्यानंतर तसेच त्याला आधारकार्डशी जोडण्यात आल्यानंतर अपात्र किंवा बोगस रेशनकार्डची ओळख पटवल्यानंतर डिजिटाइज केलेल्या डेटामधील पुनरावृत्ती टाळून तसेच लाभार्थ्यांचे स्थलांतर किंवा मृत्यूच्या प्रकरणांची खातरजमा करून राज्य आमि केंद्रशासित प्रदेशातील सरकारांनी २०१३ ते २०२० पर्यंत देशभरातील ४ लाख ३९ हजार रेशन कार्ड रद्द करण्यात आली आहेत.याशिवाय एनएफएसए कव्हरेजचा जारी करण्यात आलेला संबंधित कोटा, संबंधित राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांनी नियमितपणे एनएफएसए अंतर्गत लाभार्थ्यांची योग्य ओळख पटवण्यासाठी वापरण्यात येत आहे. या अंतर्गत पात्र ठरणाऱ्या लाभार्थ्यांना आणि कुटुंबांचा अंतर्भाव करण्याचे आणि त्यांना नवे रेशनकार्ड देण्याचे काम सुरू आहे. हे काम अधिनियमांतर्गत प्रत्येक राज्य आणि केंद्रशासित प्रदेशासाठी परिभाषित कव्हरेजच्या संबंधित मर्यादेच्या अंतर्गत केले जात आहे.

एनएफएसएच्या अंतर्गत टीपीडीएसच्या माध्यमातून ८१ कोटी ३५ लाख लोकांना अत्यंत माफक किमतीत अन्नधान्य उपलब्ध करून देत आहे. २०११च्या जनगणनेनुसार देशाच्या लोकसंख्येनुसार ही संख्या दोन तृतियांश एवढी आहे. सध्या देशातील ८० कोटींहून अधिक लोकांना केंद्र सरकारकडून उपलब्ध करण्यात आलेले धान्य खरेदी करतात.

टॅग्स :foodअन्नCentral Governmentकेंद्र सरकारIndiaभारत