शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

सरकारकडून मोफत लसीकरणाची तयारी सुरू; दिली ७४ कोटी कोरोना लसींच्या डोसची ऑर्डर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2021 19:16 IST

Coronavirus Vaccine : कोविशिल्ड आणि कोवॅक्सिनच्या डोसेसची ऑर्डर देण्यात आल्याची केंद्राची माहिती. अॅडव्हान्स ऑर्डरसाठी ३० टक्के अॅडव्हान्स पेमेंट देणार.

ठळक मुद्देकोविशिल्ड आणि कोवॅक्सिनच्या डोसेसची ऑर्डर देण्यात आल्याची केंद्राची माहिती.अॅडव्हान्स ऑर्डरसाठी ३० टक्के अॅडव्हान्स पेमेंट देणार.

सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १८ वर्षांवरील सर्वांचं मोफत लसीकरण केलं जाणार असल्याची घोषणा केली होती. तसंच आता याचा खर्च केंद्र सरकारच उचलणार असून कोणत्या राज्यांना किती लसींचे डोस दिले जातील याची माहिती आठवडाभरापूर्वीच देण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलं होतं. यानंतर आता केंद्र सरकारनं तब्बल ७४ कोटी लसींच्या डोसची ऑर्डर दिली आहे. नीति आयोगाचे सदस्य डॉ. व्ही.के.पॉल यांनी यासंदर्भातील माहिती दिली. "काही राज्यांनी गेल्या महिन्यात लसींच्या डोसची खरेदी केंद्र सरकारमार्फत केली जावी असं म्हटलं होतं. सध्या कोविशिल्डच्या २५ कोटी आणि कोवॅक्सिनच्या १९ कोटी डोसेसची ऑर्डर कंपन्यांना देण्यात आली आहे. ही एक अॅडव्हान्स ऑर्डर आहे. यासाठी ३० टक्के अॅडव्हान्स पेमेंटही केलं जाईल. केंद्र सरकारनं एकूण ७४ कोटी अॅडव्हान्स डोसची ऑर्डर दिली आहे," असं पॉल म्हणाले. सप्टेंबर महिन्यापर्यंत काही बायोलॉजिकल लसी मिळण्याची शक्यता आहे. यासाठी ३० कोटी डोसेसची ऑर्डरही देण्यात आल्याचं पॉल म्हणाले.

मुलांसाठीच तिसरी लाट येईल याचा डेटा नाही -गुलेरिया"चेन ऑफ ट्रान्समिशन रोखण्यासाठी कोविड अॅप्रोप्रियेट बिहेविअर ठेवावे लागेल. आता चिंता, तिसरी लाट केव्हा येणार अथवा येऊ शकते आणि ती मुलांसाठी किती घातक असेल? याची आहे. स्पॅनिश फ्लू, एच1 एन1 मध्येही अशाच लाटा दिसून आल्या होत्या. जेव्हा व्हायरसमध्ये बदल होतो, तेव्हा लाट दिसून येते," असं एम्सचे प्रमुख रणदीप गुलेरिया म्हणाले. एम्सचे संचालक रणदीप गुलेरिया यांनी म्हटले आहे, की कोरोनाच्या तिसऱ्या लाटेसंदर्भात आमच्याकडे कुठल्याही प्रकारचा डेटा नाही. यामुळे ही लाट मुलांसाठी किती घात असेल? हे सांगणे अवघड असल्याचं त्यांनी नमूद केलं.  

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसIndiaभारतNarendra Modiनरेंद्र मोदीNIti Ayogनिती आयोगAIIMS hospitalएम्स रुग्णालय