शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

'मंदिरात नववर्ष साजरं करायचं नाही, ही आपली संस्कृती नाही';  आंध्र प्रदेश सरकारने केलं परिपत्रक जारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2017 15:25 IST

आंध्र प्रदेश सरकारने परिपत्रक काढत राज्यातील मंदिरांना नववर्ष साजरं न करण्याचा आदेश दिला आहे. आंध्र प्रदेश सरकारने 31 डिसेंबर आणि 1 जानेवारीला नववर्ष साजरं न करण्याचा आदेशच काढला असून, यामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

ठळक मुद्देआंध्र प्रदेश सरकारने परिपत्रक काढत राज्यातील मंदिरांना नववर्ष साजरं न करण्याचा आदेश दिला आहेनववर्ष साजरं करणं आपल्या संस्कृतीचा भाग नसल्याचं सरकारने परिपत्रकात सांगितलं आहेयामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता

विजयवाडा - आंध्र प्रदेश सरकारने परिपत्रक काढत राज्यातील मंदिरांना नववर्ष साजरं न करण्याचा आदेश दिला आहे. आंध्र प्रदेश सरकारने 31 डिसेंबर आणि 1 जानेवारीला नववर्ष साजरं न करण्याचा आदेशच काढला असून, यामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. नववर्ष साजरं करणं आपल्या संस्कृतीचा भाग नसल्याचं सरकारने परिपत्रकात सांगितलं आहे.  

आंध्र प्रदेश सरकाराचा देणगी विभाग असणा-या हिंदू धर्म परिरक्षणा ट्रस्टने हे परिपत्रक जारी केलं आहे. यामध्ये स्पष्टपणे सांगण्यात आलं आहे की, मंदिरांनी नववर्ष साजरं करण्याची काही गरज नाही. तसंच नववर्षाला मंदिरात दर्शनासाठी येणा-या भाविकांनाही शुभेच्छा देण्याची कोणती गरज नाही. 

'हिंदू धर्म पंरपरेप्रमाणे लोकांनी तेलगू नववर्ष उगाडीच्या दिवशी मंदिरात जाऊन पाया पडलं पाहिजे. त्याच दिवशी मंदिरांनी नववर्षाचे कार्यक्रम आयोजित केले पाहिजे', असं परिपत्रकात सांगण्यात आलं आहे. परिपत्रकात काही मंदिरं नववर्ष साजरा करत असून, दुस-या दिवशीही ते सुरु ठेवत असल्याची नोंद करण्यात आली आहे. यासोबत नववर्ष साजरा करण्यासाठी फुलांच्या सजावटीसाठी आणि कार्यक्रमांसाठी निधीमधील पैसे वापरणे हिंदू धर्माविरोधात असल्याचंही सांगण्यात आलं आहे. परिपत्रकातून आदेशाचं पालन करण्याची सक्ती करण्यात आली आहे. 

'नववर्ष हे इंग्रजी कॅलेंडरमधील कार्यक्रम आहे. पण उगाडी हा आपल्या पंरपरेचा भाग असून त्यात ज्योतिषशास्त्रीय बदल दर्शवले जातात. मंदिरांनी इंग्लिश नववर्ष साजरं न करता उगाडी साजरा करावा', असं एका अधिका-याने सांगितलं आहे. 

राज्यात 15 हजाराहून जास्त मंदिरे आहेत. त्यांना ए, बी आणि सी असा दर्जा देण्यात आला आहे. एक कोटीपेक्षा जास्त कमाई करणा-या मंदिरांनी 'ए' दर्जा देण्यात आला आहे. तिरुमला येथील वेंकटेश्वरा मंदिरात मोठ्या प्रमाणात नववर्ष साजरं केलं जातं.

टॅग्स :New Yearनववर्षTempleमंदिरAndhra Pradeshआंध्र प्रदेशNew Year 2017नववर्ष २०१७New Year 2018नववर्ष २०१८