शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2024 05:52 IST

‘किन्नेरा’ दुर्मीळ वाद्याला दिली होती नवी ओळख

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : ‘किन्नेरा’ या दुर्मीळ वाद्याला पुनरुज्जीवन दिल्याचा सन्मान म्हणून दोन वर्षांपूर्वी दर्शनम मोगुलैया (७३) यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. मात्र, आता त्यांच्यावर मजुरी करण्याची वेळ आली आहे. ते हैदराबादच्या तुर्कयमजलमध्ये मजूर म्हणून काम आहेत. 

तत्कालीन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते मोगुलैया यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. यानंतर ते चर्चेत आले होते. राज्यातही त्यांना मोठा सन्मान मिळाला. तेलंगणाचे तत्कालीन मुख्यमंत्री केसीआर यांच्यापासून मंत्री आणि अधिकाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन केले. त्याच्यासोबतचे बरेच फोटो काढले अन् नंतर विसरून गेले.

एकामागून एक अशा अनेक अडचणींमुळे त्यांना तेलंगणा सरकारकडून मिळालेली एक कोटी रुपयांची रोख रक्कम कौटुंबीक गरजांसाठी खर्च झाली. ९ मुलांचे वडील असलेले मोगुलैया म्हणाले की, मला औषधांसाठी महिन्याला किमान ७ हजार रुपये खर्च येतो. याशिवाय नियमित वैद्यकीय चाचण्या आणि इतर खर्च आहेत. राज्य सरकारने त्यांना भूखंड जाहीर केला होता. त्याचे वाटप दोन वर्षांनंतरही झालेले नाही.

सर्वजण मदतीला होकार देतात अन् ...nराज्य सरकारकडून मंजूर करण्यात आलेले १० हजार रुपये मासिक मानधन नुकतेच बंद झाले त्यामुळे परिस्थिती आणखीणच कठीण झाल्याचे मोगुलैया यांनी सांगितले. nमी मदत मागण्यासाठी सरकारी कार्यालयांमध्ये चकरा मारत असून, लोकप्रतिनिधींना भेटून मदत घेत आहे. nसर्वजण होकार देत आहेत. मात्र, कोणीही मदत न केल्याचे त्यांनी सांगितले.

... मजूर म्हणून करावे लागतेय कामnत्यांच्या तीन मुलांचा आजाराने मृत्यू झाला. तिघे विवाहित आहेत, इतर तिघे अजूनही विद्यार्थी आहेत. मोगुलैया यांनी सांगितले की, मी कामासाठी अनेक लोकांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. nलोकांनी मला सहानुभूती दाखवली आणि थोडेफार पैसेही दिले. पण, मला रोजगार मिळाला नाही. शेवटी कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी मला मजूर म्हणून काम करावे लागले.

टॅग्स :padma shri awardsपद्मश्री पुरस्कार