शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

"आई, मी संन्यास घेतोय..."; मुलगा घर सोडून बेपत्ता; फोनच्या सर्च हिस्ट्रीने पोलीसही चक्रावले

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2026 11:47 IST

बारावीत शिकणाऱ्या निखिल कुमार गुप्ता या विद्यार्थ्याचा पाच दिवस उलटूनही अद्याप कोणताही पत्ता लागलेला नाही.

बिहारच्या पकडी मिश्राइन गावच्या पोलीस ठाणे हद्दीतील बारावीत शिकणाऱ्या निखिल कुमार गुप्ता या विद्यार्थ्याचा पाच दिवस उलटूनही अद्याप कोणताही पत्ता लागलेला नाही. घर सोडण्यापूर्वी निखिलने आपल्या आईच्या नावे एक भावूक पत्र लिहिलं होतं. या पत्रात त्याने आपल्याला होत असलेल्या मानसिक त्रासाचा आणि संन्यास घेण्याचा उल्लेख केला आहे. या घटनेमुळे कुटुंबीयांना मोठा धक्का बसला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. दरम्यान त्याच्या मोबाईलच्या 'सर्च हिस्ट्री'मध्ये धक्कादायक माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, १६ फेब्रुवारीच्या रात्री निखिल जेवून आपल्या खोलीत झोपायला गेला होता. रात्री दोन वाजेपर्यंत तो आपल्या अंथरुणावरच होता, असं त्याच्या आईने सांगितलं. मात्र, सकाळी पाच वाजता आई त्याला उठवायला गेली असता खोली रिकामी आढळली. सुरुवातीला तो परीक्षेला गेला असावा असं वाटलं, पण तो परीक्षा केंद्रावर पोहोचलाच नाही. त्यानंतर त्याच्या खोलीत आईच्या नावे लिहिलेलं एक पत्र सापडलं ज्यामध्ये त्याने ६०० रुपये घेऊन संन्यास घ्यायला जात असल्याचं म्हटलं होतं.

निखिलचे वडील पॅरालिसिसने आजारी आहेत, त्यामुळे घराची संपूर्ण जबाबदारी निखिलवरच होती. तो शिकून कुटुंबाचा आधार बनेल, अशी आशा घरच्यांना होती. पत्र वाचल्यापासून त्याच्या आईची प्रकृती खालावली आहे. कुटुंबीयांना वृंदावनमधून एक फोन आला होता, ज्यामध्ये निखिल एका बाबांकडे बसलेला असल्याचं सांगण्यात आलं, मात्र अद्याप याची पुष्टी झालेली नाही.

पोलीस तपासात निखिलच्या मोबाईलची ब्राउझिंग हिस्ट्री तपासली असता, त्यात जीवन आणि मृत्यूशी संबंधित अनेक प्रश्न सर्च केल्याचं आढळलं आहे. यामुळे पोलिसांची चिंता वाढली असून ते सर्व बाजूंनी तपास करत आहेत.

तपासादरम्यान एका ऑटो चालकाने माहिती दिली की, पहाटे चारच्या सुमारास निखिल त्याच्या रिक्षाने उत्तर प्रदेशच्या सीमेकडे गेला होता. पोलीस आता रेल्वे स्टेशन, बस स्टँड आणि सार्वजनिक ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज तपासत आहेत. उत्तर प्रदेश पोलिसांशीही संपर्क साधण्यात आला आहे. पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, निखिलचा शोध घेण्यासाठी पथकं रवाना झाली आहेत. 

English
हिंदी सारांश
Web Title : Marathi Teen Disappears, Declares Renunciation; Search History Alarms Police

Web Summary : Bihar teen Nikhil Kumar Gupta vanished after declaring renunciation in a letter to his mother. His phone's search history revealed disturbing queries about life and death, worrying police. Authorities are searching CCTV footage and coordinating with Uttar Pradesh police, following a tip he headed towards the border.
टॅग्स :BiharबिहारCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस