बहादुरा येथील गोपाल माळी यांचा संशयास्पद मृत्यू घातपाताचा संशय, रेल्वे रुळावर आढळले प्रेत सुसाईड नोट सापडल्याने पोलिस चक्रावले
By Admin | Updated: May 10, 2014 19:41 IST2014-05-10T19:41:42+5:302014-05-10T19:41:42+5:30
कवठा बहादुरा - बाळापूर तालुक्यातील बहादुरा येथील गोपाल देवराव माळी यांचा मृतदेह नागझरीजवळच्या पुलावर आढळून आल्याने खळबळ माजली आहे. माळी यांच्या मृत्यूमागे घातपात असल्याचा आरोप त्याच्या नातेवाईकांनी केल्यामुळे प्रकरणाने गंभीर वळण घेतले आहे. घटनास्थळावर सुसाईड नोट सापडल्याने प्रकरणाचा गुंता वाढला आहे.

बहादुरा येथील गोपाल माळी यांचा संशयास्पद मृत्यू घातपाताचा संशय, रेल्वे रुळावर आढळले प्रेत सुसाईड नोट सापडल्याने पोलिस चक्रावले
ब ी दर्गा शरीफ : भद्रकाली पोलिसांच्या वतीने चादर अर्पणजुने नाशिक : येथील सर्वधर्मीयांचे श्रद्धास्थान असलेले हजरत सय्यद सादिकशाह हुसेनी बाबा यांच्या बडी दर्गा शरीफच्या प्रांगणात आजपासून वार्षिक बारादिवसीय उरुसाला (यात्रोत्सव) प्रारंभ झाला आहे. जुन्या नाशकासह संपूर्ण शहरातील सर्वधर्मीय भाविकांसाठी उरुसाचे मुख्य आक र्षण असते. यंदाही भद्रकाली पोलीस ठाण्यामधून चादर शरीफची पारंपरिक पद्धतीने मिरवणूक काढण्यात आली. पोलीस उपआयुक्त अविनाश बारगळ, सहायक पोलीस आयुक्त पंकज डहाणे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश पाटील, हाजी मीर मुख्तार अशरफी, एजाज रझा मकरानी, सलीम पटेल यांच्यासह पोलीस कर्मचारी सहभागी झाले होते. यावेळी सहभागी मीलाद पथकाच्या वतीने बाबांच्या स्तुतिगीतांचे डफलीच्या तालावर पठण के ले जात होते. दरम्यान, फातीहा व दरूदोसलामचे पठण करत मजार शरीफवर चादर अर्पण करण्यात आली. यावेळी दर्ग्याचे विश्वस्त फईम पिरजादा, वसीम पिरजादा, अन्सार पिरजादा यांच्यासह समाजबांधव उपस्थित होते. उरुसानिमित्त बडी दर्गा विश्वस्त मंडळाच्या वतीने दर्ग्याच्या आवारात एकूण सहा सीसीटीव्ही कॅमेरे कार्यान्वित करण्यात आले आहेत. फोटो कॅप्शन - ३० पीएचअेपी ८८- भद्रकाली पोलीस ठाण्याच्या वतीने काढण्यात आलेल्या चादरच्या मिरवणुकीत सहभागी पोलीस उपआयुक्त अविनाश बारगळ, पंकज डहाणे, रमेश पाटील, मीर मुख्तार अशरफी, नगरसेवक संजय साबळे यांच्यासह सहभागी समाजबांधव.