शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
2
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
3
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
4
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
5
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
6
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
7
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
8
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
9
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
10
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
11
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
12
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
13
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
14
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
15
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
16
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
17
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
18
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
19
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
20
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन

आता स्मार्टफोनसाठी गुगलचा रिकॅपचा

By admin | Updated: June 10, 2017 13:56 IST

गुगलने स्मार्टफोन युझर्सच्या सुरक्षेच्या दृष्टीने अजून एक पाऊल उचलले असून आता गुगल अँड्रॉइड धारकांच्या सुरक्षेसाठी रिकॅपचा चा वापर करणार आहे.

- अनिल भापकर

गुगलने स्मार्टफोन युझर्सच्या सुरक्षेच्या दृष्टीने अजून एक पाऊल उचलले असून आता गुगल अँड्रॉइड धारकांच्या सुरक्षेसाठी रिकॅपचा चा वापर करणार आहे. ज्यामुळे स्मार्टफोनच्या सुरक्षेमध्ये अजून भर पडणार आहे. म्हणजे आता स्मार्टफोनमध्ये इनव्हिजीबल रिकॅपचा चा वापर करून जो स्मार्टफोन वापरात आहे तो माणूसच आहे कोणी रोबोट किंवा व्हायरस नाही हे ओळखणार आहे. हे ओळखण्यासाठी मशीन लर्निंग आणि ऍडव्हान्स रिस्क ऍनालिसिस तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे. म्हणजे तुमच्या स्मार्टफोनच्या छोट्याशा स्क्रीन वर तुम्हाला आता कॅपचाची बारीक अक्षरे वाचावी लागणार नाही . हे काम तुमचा स्मार्टफोन करेल.

कॅपचा म्हणजे नेमकं काय ?जेव्हा तुम्ही एखादा ई-मेल आयडी तयार करता किंवा एखाद्या वेबसाईटवर साईन अप करता तेव्हा सगळ्यात शेवटी एका बॉक्समध्ये काही वेडीवाकडी इंग्रजी अक्षरे तुम्हाला दाखविली जातात आणि ती ओळखून तुम्हाला दुसऱ्या बॉक्समध्ये लिहायला सांगितले जाते. ही अक्षरे एकमेकात घुसलेली असतात, लवकर ओळखता येत नाही.म्हणजे पी आहे कि क्यू आहे? बी आहे कि  डी आहे? कॅपिटल आहे कि स्मॉल लेटर आहे? हे ओळखताना अगदी नाकीनऊ येते आणि तुम्हाला त्या वेबसाईट वाल्यांचा रागही येतो, की  हे वेबसाईटवाले फुकट साईन अप करायला देतात म्हणजे काय आपली परीक्षा घेणार का ? ही सर्व वेडीवाकडी अक्षरे डोळ्यांच्या डॉक्टरांप्रमाणे ओळखायला का लावतात? यामागे काही उद्देश आहे,की उगीच आपल्याला त्रास देण्यासाठी वेबसाईटवाले असे करतात? असे एक ना अनेक प्रश्न आपल्या मनातं येतात .ही जी वेडीवाकडी अक्षरे तुम्हाला लिहायला सांगितली जातात, त्याला आयटीवाल्यांच्या भाषेत  कॅपचा असे म्हणतात. कॅपचा म्हणजे ‘कम्प्लिटली आॅटोमेटेड पब्लिक ट्युरिंग टेस्ट टू टेल कॉम्प्युटर्स अँड ह्युमन अपार्ट’चे लघुरूप आहे.

कॅपचा कशासाठी ?कॅपचा हा एक प्रोग्राम आहे. तो आॅनलाईन टेस्ट घेत असतो. म्हणजे जो यूजर एखाद्या वेबसाईटवर साईन अप किंवा रजिस्ट्रेशन करतो, त्यावेळी हा प्रोग्राम त्याला काही वेडीवाकडी अक्षरे दाखवतो आणि ती अक्षरे दुसऱ्या बॉक्समध्ये ओळखून लिहावे लागतात. कॅपचा ही वेबसाईट सिक्युरिटीसाठी वापरली जाते. ते कसे हे खाली पाहूया.

१. वेबसाईटवर बोगस रजिस्ट्रेशन टाळण्यासाठी-अनेक वेबसाईटवर मोफत रजिस्ट्रेशन उपलब्ध असते. अशा वेळी बॉटस् या व्हायरसचा वापर करून बोगस रजिस्ट्रेशन अशा वेबसाईट्सवर केल्या जाऊ शकते. तेव्हा हे बोगस रजिस्ट्रेशन टाळण्यासाठी कॅपचाचा वापर केला जातो;कारण अजून तरी कॅपचा वाचता येईल असा प्रोग्राम किंवा व्हायरस बनविण्यात फारसे यश आलेले नाही. त्यामुळे बॉटससारख्या व्हायरसला कॅपचा वाचता येत नसल्यामुळे बोगस रजिस्ट्रेशन बऱ्यापैकी थांबविणे शक्य झाले आहे.२. डिक्शनरी अ‍ॅटॅक टाळण्यासाठी-डिक्शनरी अ‍ॅटॅक हा पासवर्ड हॅक करण्याचा एक प्रकार असतो, त्यामुळे जेव्हा तुम्ही एखाद्या वेबसाईटवर रजिस्ट्रेशन करता किंवा पासवर्ड बदलता त्यावेळी कॅपचाचा वापर केला जातो; जेणेकरून तुमचा पासवर्ड सुरक्षित राहतो.३. आॅनलाईन पोलसाठी-जेव्हा एखादी आॅनलाईन पोल घेतली जाते, त्यावेळी बोगस वोटिंग टाळण्यासाठी कॅपचाचा वापर केला जातो; जेणेकरून व्हायरसचा वापर करून बोगस वोटिंग केल्या जाऊ नये.

कॅपचाचा इतिहासही जी वेडीवाकडी अक्षरे तुम्हाला लिहायला सांगितली जातात, त्याला आयटीवाल्यांच्या भाषेत कॅपचा असे म्हणतात. कॅपचा म्हणजे ‘कम्प्लिटली आॅटोमेटेड पब्लिक ट्युरिंग टेस्ट टू टेल कॉम्प्युटर्स अँड ह्युमन अपार्ट’चे लघुरूप आहे. सगळ्यात पहिल्यांदा कॅपचाचा वापर अल्टाव्हिस्टा या वेबसाईटने १९९७ साली केला.कॅपचाच्या वापरामुळे अल्टाव्हिस्टा वेबसाईटचा स्पॅमचा ९५ टक्के त्रास कमी झाला. २००० साली याहूच्या चाटरूममध्ये चॅटिंग करताना काही बॉटस् (अर्थात व्हायरस) चॅटिंग करणाऱ्याना  डिस्टर्ब करायचे व जाहिराती असलेल्या वेबसाईटकडे  घेऊन जायचे. या समस्येवर उपाय करण्यासाठी याहूने कॅपचाचा वापर सुरू केला.या वेड्यावाकड्या अक्षरांना कॅपचा हे नावसुद्धा २००० साली मिळाले. त्यानंतर मात्र अनेक वेबसाईट, ब्लॉग आदींनी साईन अप करताना कॅपचाचा वापर करायला सुरुवात केलेली आहे. यामध्ये फेसबुक ,गुगल आदीसुद्धा आहेत.