शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांकडे स्वाभिमान तर अजितदादांकडे अहंकार; रोहित पवारांची बोचरी टीका
2
गुजरातच्या गांधीनगर येथील मतदान केंद्रात PM नरेंद्र मोदींनी बजावला मतदानाचा हक्क
3
बारामतीत अजित पवार गटावर पैसे वाटल्याचा आरोप; रोहित पवारांचा दावा, Video दाखवले
4
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात
5
Met Gala 2024: आलिया भटच्या 'देसी लूक'ने वेधलं लक्ष, सब्यसाची साडीत दिसली जणू राजकुमारी
6
संपादकीय: सगळ्याच जिभा घसरल्या !
7
सुनीता विल्यम्स यांची अवकाश भरारी स्थगित; टेक ऑफच्या आधी अंतराळयानात तांत्रिक बिघाड
8
कांदा निर्यातबंदीची मोठी किंमत मोजावी लागली; राज्यातील शेतकऱ्यांना एकरी तीन लाखांचा फटका
9
किम जोंगच्या ‘प्लेझर स्क्वॉड’साठी २५ तरुणी; तिची दोनदा निवड झाली, पण...
10
‘घर की बिटीया’ राजकीय आखाड्यात; अखिलेश यादवांची मुलगी प्रचाराच्या मैदानात... वेधतेय लक्ष...
11
निवडणूक आयोगाचा कणा थोडा ताठ राहील? एकाएकी मतदान वाढले, कुठे तरी पाणी मुरतेय...
12
आजचे राशीभविष्य - ७ मे २०२४; आर्थिक लाभाची शक्यता, विवाहेच्छुकांना योग्य जोडीदार मिळण्याची संभावना
13
भाजपचे २० ते २५ आमदार फोडण्याचे उद्धव ठाकरे यांचे कारस्थान होते; एकनाथ शिंदे यांचा गौप्यस्फोट
14
भारत-पाकिस्तान करायला ही काय क्रिकेटची मॅच आहे का? रमेश चेन्निथलांचा भाजपला सवाल
15
गुजराती सोसायटीत मराठी कार्यकर्त्यांना प्रचारास मज्जाव; 'आम्ही भाजपलाच मतदान करणार'
16
कितीही असाे तापमानाचा पारा; गाजवा तुमच्या मतदानाचा तोरा
17
याला म्हणतात घबाड! मंत्र्याच्या पीएचा नोकर, पगार फक्त १५ हजार; घरात ३० कोटींचा ढीग
18
काहीही करा, पण मतदानाची टक्केवारी वाढवा; अन्यथा कारवाईस तयार रहा, भाजपश्रेष्ठी धास्तावले
19
ठाकरे गट व महायुती कार्यकर्त्यांत वाद; उज्वल निकमांचा प्रचार करतानाचा प्रसंग
20
साधनसंपत्ती तरीही लोक राहिले गरिब; ओडिशात पंतप्रधान माेदींचा हल्लाबाेल

काय सांगता? अरबी समुद्रात पाण्याखाली दिसू लागलं रहस्यमय बेट; तज्ज्ञांसह सारेच हैराण

By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2021 11:57 AM

कोच्चीपासून ७ किलोमीटर अंतरावर दिसलं रहस्यमय बेट; संशोधन सुरू

कोच्ची: केरळमधील कोच्ची शहराच्या पश्चिमी तटाजवळ अरबी समुद्रात एक नवं बेट दिसू लागलं आहे. हे बेट पाण्याखाली असून गुगल मॅप्स सॅटेलाईट इमेजरीच्या माध्यमातून ते दिसून आलं आलं आहे. पाण्याखाली असलेल्या बेटाचा आकार पश्चिम कोच्चीच्या तुलनेत निम्मा आहे. समुद्रात बेटाची कोणतीही दृश्यरचना न मिळाल्यानं तज्ज्ञदेखील हैराण झाले आहेत. केरळ युनिव्हर्सिटी ऑफ फिशरीज अँड ओशन स्टडीजचे (केयूएफओएस) अधिकारी याबद्दल अधिक संशोधन करत आहेत.७ आंब्यांसाठी ४ रखवालदार अन् ६ कुत्रे तैनात; असं आहे तरी काय आंब्यांत? किंमत ऐकून चक्रावून जाल

चेलनम कार्शिका पर्यटन विकास सोसायटीच्या नावाच्या संघटनेनं केयूएफओएसच्या अधिकाऱ्यांना पत्र लिहिल्यानंतर त्यांना याबद्दलची माहिती मिळाली. त्याआधी महिन्याच्या सुरुवातीला संस्थेचे अध्यक्ष वकील के. एक्स. जुलप्पन यांनी एक फेसबुक पोस्ट लिहिली होती. त्यात त्यांनी अरबी समुद्रातील रहस्यमय बेट दाखवणारे गुगल मॅप्सचे स्क्रीनशॉट शेअर केले होते. पाण्याखाली असलेले बेट कोच्चीच्या किनाऱ्यापासून ७ किलोमीटर पश्चिमेला आहे. या बेटाची लांबी ८ किमी आणि रुंदी ३.५ किलोमीटर असल्याचा दावा जुलप्पन यांनी केला आहे.बाबो! एका आंब्याची किंमत २.७० लाख; कृषी अधिकारी हैराण, पाहणी करणार

कशी झाली बेटाची निर्मिती?कोच्ची शहरापासून ७ किलोमीटर दूर असलेल्या बेटाची निर्मिती कशी झाली यावर प्रकाश टाकण्याचं काम  सुरू असल्याची माहिती केयूएफओएसचे कुलगुरू रिजी जॉन यांनी दिली. 'गुगल मॅप्समध्ये पाहिल्यावर कोच्ची जवळ समुद्राखाली पाण्यात एक बेट दिसून येतं. हे बेट कशापासून तयार झालं आहे याची माहिती अद्याप उपलब्ध नाही. वाळू किंवा मातीपासून हे बेट तयार झालं असावं अशी शक्यता आहे. याबद्दल संशोधन होणं गरजेचं आहे,' असं जॉन यांनी सांगितलं.