शहरं
Join us  
Trending Stories
1
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
2
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
3
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
4
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
5
कूलर, पंखा, एसीमुळे किती वाढते विजेचे बिल?
6
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
7
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
8
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
9
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
10
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
11
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
12
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
13
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
14
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
15
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
16
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
17
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
18
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
19
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
20
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू

गुगल, फेसबुक, याहू, मायक्रोसॉफ्ट, व्हाटस्अ‍ॅपला प्रत्येकी १ लाख दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2018 12:41 AM

सुप्रीम कोर्ट : बालअश्लीलता कमी करण्यासाठी काय पावले उचलली?

मुंबई : आॅनलाईन बालअश्लीलता कमी करण्यासाठी काय पावले उचलली, याची ठोस माहिती न्यायालयात सादर न केल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाने आॅनलाईन सेवापुरवठादारांना प्रत्येकी १ लाख रुपये दंड भरण्याचा आदेश दिला. मार्च २०१७मध्ये सर्वोच्च न्यायालयाने सामूहिक बलात्कार, बालअश्लीलतेचे व्हिडिओ इंटरनेटवर उपलब्ध होऊ नयेत यादृष्टीने काय कारवाई करावी, यावर सल्ला देण्यासाठी एका समितीची स्थापना केली होती. सर्व सेवापुरवठादारांनी या समितीच्या शिफारशी मान्य केल्या. १६ एप्रिलच्या सुनावणीवेळी न्यायालयाने या शिफारशींच्या अनुषंगाने केलेल्या कारवाईचा प्रगती अहवाल द्यावा, असा आदेश दिला होता; मात्र गुगल, फेसबुक, याहू, मायक्रोसॉफ्ट व्हॉटस्अ‍ॅप यापैकी कोणीही अहवाल दिला नाही. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने त्यांना १ लाख रुपये भरून १५ जूनपूर्वी प्रगतीबद्दल शपथपत्र दाखल करण्याचा आदेश दिला. शासनानेदेखील यात कारवाईसाठी खूप वेळ घेतला असल्याचे नमूद करून आॅनलाईन सायबर क्राईम रिपोर्टिंग पोर्टलचे काम पूर्ण करून ३० जूनपर्यंत सुरू करावे, असाही आदेश दिला. या प्रकरणात आता २ जुलै रोजी सुनावणी होणार आहे.दोन व्हिडीओंची तक्रारजानेवारी २०१७ मध्ये एका एनजीओने माजी सरन्यायाधीश एच. एल. दत्तू यांच्याकडे यूट्यूबवरील बलात्काराच्या २ व्हिडीओंसह तक्रार केली. सर्वोच्च न्यायालयाने याची दखल घेऊन पत्र याचिका म्हणून स्वीकारली. मार्च २०१७ मध्ये न्यायालयास सल्ला देण्यासाठी समितीची स्थापना.

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयgoogleगुगल