'गुगल बॉय' कौटिल्य पंडित रुग्णालयात दाखल

By Admin | Updated: March 6, 2017 02:05 IST2017-03-05T21:05:39+5:302017-03-06T02:05:27+5:30

'गुगल बॉय'च्या नावाने प्रसिद्ध असलेला लहानगा कौटिल्य पंडित याला रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे

'Google Boy' Kautilya Pandit admitted to hospital | 'गुगल बॉय' कौटिल्य पंडित रुग्णालयात दाखल

'गुगल बॉय' कौटिल्य पंडित रुग्णालयात दाखल

>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 5 - 'गुगल बॉय'च्या नावाने प्रसिद्ध असलेला लहानगा कौटिल्य पंडित याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. अद्वितिय बुद्धिमत्तेचा धनी असलेला कौटिल्य कोणत्याही विषयावर झटपट उत्तर देण्यामुळे 'गुगल बॉय' या नावाने ओळखला जातो. छातीत दुखत असल्यामुळे त्याला रूग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती आहे.  गेल्या काही दिवसांपासून त्याला खेत्रपाल रूग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. त्याच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. 
हरियाणातल्या करनाल जिल्ह्यातल्या कोहंड गावचा कौटिल्य अद्वितीय बुद्धिमत्तेचा धनी आहे. कौटिल्य देश-परदेशातल्या भूगोल आणि सामान्य ज्ञानाविषयी इतकी भराभर माहिती देतो की ऐकणाराच थक्क होऊन जातो. तुम्ही त्याला कोणताही प्रश्न विचारा त्याचं उत्तर तो लगेच देतो. कौटिल्यला जगातल्या अनेक देशांची माहिती अगदी तोंडपाठ आहे. कोटिल्य कोणतीही नदी, पहाड, राज्य, नामवंत व्यक्तींविषयी सहज माहिती देऊ शकतो. शिवाय कोणत्याही देशाविषयी विचारलं तर तो चटकन उत्तर देतो. कौटिल्यच्या या हुशारीनं त्याचं कुटुंबही हैराण आहे. त्याला खगोलशास्त्राविषयीही संपूर्ण माहिती आहे. कौटिल्यला मोठं होऊन खूप मोठं नाव कमवायचं आहे.
 

Web Title: 'Google Boy' Kautilya Pandit admitted to hospital