मानव उत्थान सेवा समितीतर्फे सद्भावना शिबिर

By Admin | Updated: August 27, 2015 23:45 IST2015-08-27T23:45:14+5:302015-08-27T23:45:14+5:30

नाशिक : अखिल भारतीय मानव उत्थान सेवा समितीच्या वतीने सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर बुधवार (दि.२६) ऑगस्ट ते गुरुवार (दि.१०) सप्टेंबर या काळात दररोज संध्याकाळी ४ वाजता सद्भावना शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

Goodwill Camp by Human Utthaan Seva Samiti | मानव उत्थान सेवा समितीतर्फे सद्भावना शिबिर

मानव उत्थान सेवा समितीतर्फे सद्भावना शिबिर

शिक : अखिल भारतीय मानव उत्थान सेवा समितीच्या वतीने सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर बुधवार (दि.२६) ऑगस्ट ते गुरुवार (दि.१०) सप्टेंबर या काळात दररोज संध्याकाळी ४ वाजता सद्भावना शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
या शिबिराअंतर्गत सतपाल महाराज यांचे शिष्य गीता, रामायण, वेद, महाभारत आदि धार्मिक ग्रंथांवर आध्यात्मिक सत्संग प्रवचनात भाविकांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे. या उपक्रमाबद्दल आयोजित पत्रकार परिषदेत माहिती देताना हरि संतोषानंद महाराज यांनी सिंहस्थ कुंभपर्व हे आध्यात्मिक चेतना जागृतीचे पर्व असून, यापर्वात होणार्‍या दि. ११ ते दि. १३ सप्टेंबर या काळात होणार्‍या सद्भावना संमेलनात सहभागी होण्याचे आवाहन केले. या संमेलनाअंतर्गत होणार्‍या रक्तदान शिबिर, आरोग्य शिबिर, फळवाटप अशा उपक्रमांचा लाभ घेण्यास सांगितले. या पत्रकार परिषदेच्या वेळी कमलेशानंद महाराज, आराधना बाईजी, नीतीबाईजी, गौतम भंदुरे, विजय भंदुरे, उत्तम बिडवे, श्रीहरी शेळके आदि उपस्थित होते. (प्रतिनिधी)

Web Title: Goodwill Camp by Human Utthaan Seva Samiti

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.