केंद्र सरकारच्या निर्णयाचं अदर पूनावालांकडून समर्थन; म्हणाले, "वैज्ञानिक दृष्टीकोनातून घेतलेला उत्तम निर्णय"

By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2021 08:19 PM2021-05-13T20:19:52+5:302021-05-13T20:24:34+5:30

Dosage interval for Covishield: लसीचा दुसरा डोस आता मिळणार १२ ते १६ आठवड्यांच्या दरम्यान. केंद्र सरकारनं मान्य केली पॅनलची शिफारस.

Good Scientific Decision Adar Poonawalla On Longer Gap Between Jabs covid 19 vaccine covishield | केंद्र सरकारच्या निर्णयाचं अदर पूनावालांकडून समर्थन; म्हणाले, "वैज्ञानिक दृष्टीकोनातून घेतलेला उत्तम निर्णय"

केंद्र सरकारच्या निर्णयाचं अदर पूनावालांकडून समर्थन; म्हणाले, "वैज्ञानिक दृष्टीकोनातून घेतलेला उत्तम निर्णय"

Next
ठळक मुद्देलसीचा दुसरा डोस आता मिळणार १२ ते १६ आठवड्यांच्या दरम्यान.केंद्र सरकारनं मान्य केली पॅनलची शिफारस.

Dosage interval for Covishield: देशात कोरोना लसीची टंचाई (Corona Vaccine Shortage) भासू लागली आहे. पहिला डोस घेतलेल्यांना दुसरा डोस घेण्यासाठी वारंवार लसीकरण केंद्राच्या (Vaccination centers) चकरा माराव्या लागत आहेत. यामुळे आधी ३० दिवसांत लसीचा दुसरा डोस घेण्यास सांगण्यात आलं होतं. परंतु नंतर सरकारनं हा कालावधी ४५ दिवसांवर नेला होता. आता या अंतरात आणखी करण्यात आली आहे. आता नागरिकांना कोविशिल्ड या लसीचा दुसरा डोस १२ ते १६ आठवड्यांदरम्यान देण्यात येणार आहे.  (The immunisation panel has recommended increasing the gap between two doses of Covishield vaccine to 12-16 weeks) वर्किंग ग्रुपनं केलेल्या शिफारसी सरकारनं मान्य केल्या आहेत. यानंतर सीरम इन्स्टिट्यूटचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पूनावाला यांनी सरकारच्या निर्णयाचं समर्थन केलं असून उत्तम वैज्ञानिक निर्णय असल्याचं म्हटलं आहे.

"हा निर्णय कार्यक्षमता आणि इम्युनोजेनिसिटी दृष्टिकोनातून फायदेशीर आहे. हा अतिशय उत्तम निर्णय आहे, कारण सरकारला मिळालेल्या आकडेवारीवरुन त्यांनी हे अंतर वाढविण्याच्या दृष्टीने एक चांगला वैज्ञानिक निर्णय घेतला आहे," असं अदर पूनावाला यांनी सांगितलं. त्यांनी एनडीटीव्हीशी साधलेल्या विशेष संवादादरम्यान यावर भाष्य केलं. 

ब्रिटनमध्ये उपलब्ध रियल लाईफ एविडन्सच्या आधारे वर्किंग ग्रुपनं केंद्र सरकारला कोविशिल्ड या लसीच्या दोन डोसमध्ये १२ ते १६ आठवड्यांचं अंतर ठेवण्याची शिफारस केली होती. ती सरकारनं मंजूर केली आहे. परंतु कोवॅक्सिनबाबत कोणतीही शिफारस करण्यात आली नव्हती. 

कोवॅक्सिनच्या कालावधीत बदल नाही

केंद्र सरकारची कोरोना सल्लागार समितीने सीरम इन्स्टिट्यूट बनवत असलेली ऑक्सफर्डच्या कोविशिल्डचा दुसरा डोस देण्याचा कालावधी वाढविण्याची शिफारस केली होती. कोविशिल्डच्या दोन डोसमधील अंतर १२ ते १६ आठवड्यांनी वाढविण्यास सांगण्यात आलं होतं. सध्या कोविशिल्डच्या दोन डोसमधील अंतर हे चार ते आठ आठवड्यांचं करण्यात आलं आहे. महत्त्वाचं म्हणजे भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिनच्या दुसऱ्या डोसचा कालावधी तसाच ठेवण्यात आला आहे. तो चार आठवड्यांचा आहे. 

ज्यांना कोरोनाची लागण झाली होती आणि जे बरे झाले आहेत त्यांनी देखील लगेचच कोरोना लस घेण्यासाठी धावाधाव करण्याची गरज नसल्याचे या वर्किंग ग्रुपनं म्हटलं आहे. अशा लोकांनी बरं झाल्यापासून सहा महिन्यांनी लस घ्यावी, असं या NTAGI ने सुचविलं होतं. गरोदर असलेल्या महिलांना कोणतीही लस निवडण्याची मुभा आहे. तसंच प्रसुती झाल्यानंतर महिला कधीही लस घेऊ शकतात, असे या त्यांनी नमूद केलं होतं.
 

Web Title: Good Scientific Decision Adar Poonawalla On Longer Gap Between Jabs covid 19 vaccine covishield

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.