शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

Video: कोरोना संकटकाळात आनंदाची बातमी; ओझोनच्या थरातील छिद्र पूर्णपणे बुजलं!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2020 14:33 IST

 मागील महिन्यात या छिद्राने प्रचंड मोठा आकार घेतला होता.

नवी दिल्ली: कोरोना व्हायरसने जगभरात थैमान घातलं आहे. आतापर्यत  29 लाखहून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली असून 2 लाख 6 हजारांपेक्षा जास्त लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी जगभरातील अनेक देशात लॉकडाऊन लागू केला आहे. मात्र एकीकडे कोरोनासारख्या महामारीचं संकट असताना पृथ्वीवरील ओझोन थरात एक मोठं छिद्र पडलं असल्याचे आढळून आले होते. त्यामुळे जगभरातून चिंता व्यक्त करण्यात येत होती. परंतु आता ओझोन थरामध्ये पडलेलं छिद्र पूर्णपणे बुजलं असल्याचा दावा शास्त्रज्ञांनी केला आहे.

उत्तर ध्रुवावर आर्क्टिकवर ओझोन थराच मोठं छिद्र पडलं होतं. तसेच  मागील महिन्यात या छिद्राने प्रचंड मोठा आकार घेतला होता. हे छिद्र दक्षिणी गोलार्धात पोहोचू शकेल अशी भीती देखील शास्त्रज्ञांनी व्यक्त केली होती. मात्र आता ते छिद्र पूर्णपणे बंद झाल्याचं कॉपरनिकन अॅटमॉस्फियर ऑब्झर्वेशन सर्व्हिसने सांगितलं आहे. तसेच लॉकडाऊनमुळे हे छिद्र बंद झालं असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र शास्त्रज्ञांनी हा दावा फेटाळून लावला आहे.

शास्त्रज्ञ म्हणाले की, लॉकडाऊनमुळे कमी झालेल्या प्रदूषणाचा यामध्ये काहीही संबंध नाही. एप्रिलपासून उत्तर ध्रुवाचं तापमान वाढू लागतं. त्यामुळे स्ट्रॅटोस्फेरिक थर गरम होण्याचे प्रमाण देखील मोठ्या प्रमाणात वाढतं. यामुळे ओझोन थरावरील छिद्र बंद झालं असल्याचे शास्त्रज्ञांनी सांगितले आहे.

क्लोरोफ्लोरोकार्बन्स (CFCs)मुळे या थराचं नुकसान होत होतं. फ्रिज, एसी, फोम आदींमध्ये क्लोरोफ्लोरोकार्बन्स असतो. 1985मध्ये दक्षिण ध्रुवावर ओझोनच्या थराला मोठं छिद्र पडल्याचं दिसून आलं होतं. 1990च्या दशकात जवळपास ओझोनच्या थरात 10 टक्के घट झाल्याचे दिसून आले होते. त्यानंतर  मॉन्ट्रियल प्रोटोकॉल हा करार आकाराला आला. यामध्ये उद्योगांनी पर्याय शोधण्याचं मान्य केलं. 180 देशांनी या करारावर सह्या केल्या होत्या. या देशांनी क्लोरोफ्लोरोकार्बन्सच्या वापरावर निर्बंध घालण्याचं मान्य केलं. 2000पासून दर दशकात 3 टक्के इतकी ओझोनमध्ये सुधारणा झाली आहे.

अन्य महत्त्वाच्या बातम्या 

Coronavirus: ...म्हणून आता भारताकडूनच जगाला आस; कोरोना लसीच्या निर्मितीचा विश्वास

देशात १६ मेनंतर एकही कोरोनाबाधित रुग्ण आढळणार नाही; वैद्यकीय व्यवस्थापन समितीच्या प्रमुखांचा दावा

किम जोंग उन जिवंत; दक्षिण कोरियाच्या राष्ट्राध्यक्षांच्या सल्लागारांचा मोठा खुलासा

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याEarthपृथ्वीenvironmentपर्यावरण