शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात आठवडाभर गारपीटीसह अवकाळीची शक्यता; शेतकऱ्यांनो सावध रहा....
2
शांतिगिरी महाराजांचा सहा मतदार संघात पाठींबा कोणाला? आज भूमिका जाहीर करणार
3
'ज्यांना दोन बायका, त्यांना काँग्रेस देणार २ लाख रुपये'; वरिष्ठांसमोरच उमेदवाराची घोषणा
4
‘माझा धाकटा भाऊ तोफ, मीच त्याला रोखून ठेवलंय, अन्यथा’, असदुद्दीन ओवेसींचा राणांना इशारा
5
सामाजिक विविधतेसाठी अधिक पोषक होतेय वातावरण; हिंदूंची संख्या घटली, मुस्लिमांची वाढली
6
'लसीवर दुष्परिणाम छापले होते'; कोव्हिशिल्डबाबत सीरम इन्स्टिट्यूटचे स्पष्टीकरण
7
कतारनंतर भारताचा आणखी एक राजनैतिक विजय, इराणने इस्रायलच्या मालवाहू जहाजावर असलेल्या ५ भारतीयांची केली सुटका
8
बारामतीची निवडणूक संपली अन् पवार कुटुंबातला मुलगा, मुलीचा मुद्दा पुन्हा चर्चेत
9
Sanjiv Goenka Net Worth: KL Rahul वर संतापलेले संजीव गोएंका कोण? माहितीये किती आहे नेटवर्थ?
10
‘विराट’ कामगिरीमुळे RCBचं आव्हान कामय, पण प्लेऑफमध्ये जाण्यासाठी लागेल नशिबाची साथ, आणि...
11
संपादकीय: शरद पवारांचा खडा अन् विरोधक उद्धव ठाकरेंच्या मागे लागले...
12
विवाह नोंदणी नाही तर प्राजक्ता माळीने 'या' कागदपत्रांवर केली सही, नेटकऱ्यांनी लावले अंदाज
13
इलेक्शन ड्युटी टाळण्यासाठी पुरुष शिक्षकाने गर्भवती असल्याचे भासवले; अधिकाऱ्यांनी चौकशीचे आदेश दिले
14
आजचे राशीभविष्य - १० मे २०२४; इतर काही मार्गानी आर्थिक लाभ होतील, व्यवसायात प्रगती होईल
15
सलग ३४ वर्षे आमदार! सुरेशदादा जैन सक्रिय राजकारणातून निवृत्त; उद्धवसेनेच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा
16
एअर इंडियाचा संप मागे; 'ते' कर्मचारी कामावर
17
प्रियांका गांधी अखेर मैदानात उतरल्या! जिथे जिथे जातात...
18
दिंडोरीत अजित पवार नाराज, नंदुरबार-जळगावात शिंदे गट; असहकार्याने महायुतीत टेन्शन! 
19
आजी, माजी गृहमंत्री एकाच हॉटेलात मुक्कामी पण...दोघेही म्हणतात आम्ही एकमेकांना भेटलो नाही
20
खासदारकीसाठी कुणाकुणाला भेटलात, दावोसच्या गुलाबी थंडी काय केले? प्रियंका चतुर्वेदींना शिंदे सेनेचा सवाल

चित्रपट रसिकांसाठी गुड न्यूज, १ फेब्रुवारीपासून चित्रपटगृहे 'हाऊसफुल्ल'

By जयदीप दाभोळकर | Published: January 31, 2021 1:00 PM

माहिती आणि प्रसारण मंत्रालयाकडून एसओपी जाहीर

ठळक मुद्देमाहिती आणि प्रसारण मंत्रालयाकडून एसओपी जाहीरगर्दी होणार नाही, सोशल डिस्टन्सिंगची चित्रपटगृहांना घ्यावी लागणार काळजी

कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर देशभरातील चित्रपटगृहे मार्च महिन्यापासून बंद ठेवण्यात आली होती. त्यानंतर अनलॉक प्रक्रियेअंतर्गत ठराविक प्रेक्षकांच्या संख्येसह चित्रपटगृहे सुरू करण्यात आली होती. परंतु आता १ फेब्रुवारीपासून १०० टक्के क्षमतेसह चित्रपटगृहे सुरू करण्यास सरकारनं मान्यता दिली आहे. माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं यासंदर्भात एसओपी जाहीर केली असून १०० टक्के क्षमतेसह चित्रपटगृहे सुरू करण्यास मान्यता दिली आहे. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाद्वारे जाहीर करण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार चित्रपटगृहांच्या आत आणि कॉमन एरियामध्ये प्रेक्षकांना ६ फुटांचं अंतर ठेवावं लागणार आहे. तसंच चित्रपटगृहांमध्ये प्रवेश करणाऱ्या आणि प्रेक्षक बाहेर पडणाऱ्या ठिकाणी सॅनिटायझर असणंदेखील बंधनकारक करण्यात आलं आहे. याव्यतिरिक्त चित्रपटगृहांमध्ये थुंकण्यास बंदी असेल. चित्रपटगृहांमध्ये प्रवेश करणाऱ्या प्रत्येक प्रेक्षकाच्या मोबाईलमध्ये आरोग्य सेतू अॅप असणंदेखील बंधनकारक करण्यात आलं आहे. १ फेब्रुवारीपासून देशातील सर्व चित्रपटगृहे १०० टक्के क्षमतेसह सुरु होणार आहेत. याव्यतिरिक्त पार्किग लॉट आणि चित्रपटगृहांच्या जवळपास गर्दी नियंत्रित करण्यासही सांगण्यातआलं आहे.पार्किगमध्येदेखील सोशल डिस्टन्सिंगचं पालन होणं अनिवार्य करण्यात आलं आहे. लिफ्टमध्येदेखील अधिक लोकांना प्रवेश देणं टाळण्याच्या सूचना सरकारनं केल्या आहेत. याशिवाय कॉमन एरिया, लॉबी आणि शौचालयांमध्ये इंटरवलच्यावेळी गर्दी जमू नये याची चित्रपटगृहांना काळजी घ्यावी लागणार आहे. तसंच इंटरवलमध्ये प्रेक्षकांना त्यांच्या जागेवरून न उठण्याच्या सूचनादेखील केल्या जाऊ शकतात. याव्यतिरिक्त इंटरवलचा कालावधीदेखील मोठा असू शकतो. यापूर्वी अनलॉक प्रक्रियेअंतर्गत ऑक्टोबर महिन्यात सरकारनं देशातील चित्रपटगृहे सुरू करण्यास परवनगी दिली होती. त्यानंतर दिल्ली, हरयाणा, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, मध्य प्रदेश, गुजरात, आंध्र प्रदेश आणि कर्नाटक सारख्या राज्यांनी ५० टक्के प्रेक्षक क्षमतेसह चित्रपटगृहे सुरू करण्यास मान्यता दिली होती. तसंच मास्क, सॅनिटायझर, सोशल डिस्टन्सिंग अशा गोष्टी बंधनकारक करण्यात आल्या होत्या. 

टॅग्स :IndiaभारतTheatreनाटकcorona virusकोरोना वायरस बातम्याInformation & broadcasting ministryमाहिती व प्रसारण मंत्रालय